शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सेलिब्रिटी लसीकरण प्रकरण: ओम साई आरोग्य केअर प्रा. लिमिटेडवर भाजपची कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 16:42 IST

Coronavirus Vaccine : निरंजन डावखरे यांनी केली आयुक्तांकडे मागणी. काही दिवसांपूर्वी बनावट ओळखपत्र तयार करून एका अभिनेत्रीनं घेतली होती लस.

ठळक मुद्देनिरंजन डावखरे यांनी केली आयुक्तांकडे मागणी. काही दिवसांपूर्वी बनावट ओळखपत्र तयार करून एका अभिनेत्रीनं घेतली होती लस.

ठाणे  : अभिनेत्री मीरा चोप्रा हिचे बनावट ओळखपत्र तयार करून तिला  बेकायदेशीरपणे लस देण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल आता महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे. या अहवालानुसार एकट्या मीरा चोप्रालाच अशा प्रकारे बेकायदेशीर लस देण्यात आली नसून २१ श्रीमंत तरुण आणि तरुणींचे बनावट ओळखपत्र तयार करून १५ जणांना अशा प्रकारे लस देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये आणखी एका हिंदी मालिकेमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीला अॅडमीनच्या नावाने बनावट ओळखपत्रही देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु तिने लस घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. परंतु या प्रकरणानंतर ओम साईन आरोग्य केअर प्रा. लिमिटेड ही कंपनी आता अडचणीत आली असून, सदर कंपनीवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी भाजपचे जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे.राज्य शासनाने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद केले असताना मात्र अभिनेत्री मीरा चोप्राला लस देण्यासाठी तिला या फ्रंटलाईन वर्कर दाखवून पालिकेच्या पार्कीग प्लाझा या ठिकाणी लस देण्यात आली होती. त्यानंतर आणखी एका हिंदी सिरीअलमध्ये काम कणाऱ्या एका अभिनेत्रीला अॅडमिनच्या नावाने ओळखपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आणखी २१ जणांना अशाच प्रकारे ओळखपत्र देण्यात आले असून त्यातील १५ जणांचे लसीकरण झाल्याची माहिती देखील अहवालातून समोर आली होती. गुरुवारी या संदर्भातील अहवाल चौकशी समितीने आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे सादर केला आहे. आता आयुक्त या संदर्भात काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.भाजपचा आक्रमक पवित्रा

दरम्यान दुसरीकडे या प्रकरणी भाजप आक्रमक झाली असून त्यांनी आता लसीकरणाचा भ्रष्टाचार करणाऱ्या  संबंधीत ओम साई आरोग्य केअर प्रा. लि. या कंपनीवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. या कंपनीच्या विरोधात अनेक अनियमिततेचे ठपके ठेवण्यात आले आहेत. नर्सेच्या पगारांचा विषय असेल किंवा ग्लोबलमधील व्हेंटिलेटर भ्रष्टाचाराचे प्रकरण असेल यामध्ये या कंपनीचे नाव पुढे आलेले आहे. परंतु या प्रकरणात महापालिका संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम करीत असल्याचा आरोपही डावखरे यांनी केला आहे. चौकशी सुरु असतांना चौकशी समितीने संबंधीत ठेकेदाराला चौकशीसाठी बोलावले होते. परंतु त्यांनी हजेरी लावली नसून हा चौकशी समितीचा आणि पालिकेचा अपमान आहे. त्यामुळे संबधींतावर तत्काळ कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसthaneठाणेGovernmentसरकारThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाBJPभाजपाNiranjan Davkhareनिरंजन डावखरे