शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

ठाण्यातील वृक्षवल्लीत पाहायला मिळणार महाराष्ट्राची रानफुले, ‘वाइल्ड फ्लॉवर्स आॅफ महाराष्ट्र’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 3:37 PM

ठाण्यातील वृक्षवल्लीत वृक्षप्रेमींना महाराष्ट्राची रानफुले एकाच छताखाली पाहायला मिळणार आहे. निमित्त आहे ते ‘वाइल्ड फ्लॉवर्स आॅफ महाराष्ट्र’हे छायाचित्र प्रदर्शनाचे

ठळक मुद्देवृक्षवल्लीमध्ये भरणार ‘वाइल्ड फ्लॉवर्स आॅफ महाराष्ट्र’हे छायाचित्र प्रदर्शन या प्रदर्शनात रानफुलांची मोहक छायाचित्रे पाहायला मिळतीलशुक्रवार १२ ते रविवार १४ जानेवारी या काळात रेमंड कंपनीच्या मैदानावर छायाचित्र प्रदर्शन

ठाणे: होप नेचर ट्रस्टतर्फे, ठाणे रोटरी ( मेन) क्लबच्या मदतीने आणि ठाणे महापालिकेच्या सहकार्याने यावर्षीच्या वृक्षवल्लीमध्ये ‘वाइल्ड फ्लॉवर्स आॅफ महाराष्ट्र’हे छायाचित्र प्रदर्शन भरणार आहे. वायतुरा, कंदिलपुष्प अर्थात सेरोपेजिया,दविबंदू अर्थात ड्रॉसेरा, काटेचेंडू, सितेची आसवं, आभाळी, अबोलिमा, सोनकी, कळलावी, भारंग, पांढरा कुडा, हळुंदा( हत्तीची सोंड), तुतारी, कचोरा, सितेची वेणी, वाघचौरा, कवळा अशा अनेक रानफुलांची मोहक छायाचित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळतील.     सह्याद्रीच्या डोंगररांगेने महाराष्ट्राच्या जैवविविधतेत टाकलेली नाजूक आणि सुगंधी भर म्हणजे वेगवेगळ््या मौसमात उमलणारी सुंदर सुंदर रानफुले. वर्षाच्या प्रत्येक ऋतुत उमलणारी ही रानफुले म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या निसर्गसंपदेचा अलंकारच. रानफुले म्हटल्यावर सर्वप्रथम आठवतात कासचे पठार, आंबोली, रायरेश्वर, राजगड, पुरंदर, मसई पठार अशा जागा. मात्र, आपल्या ठाण्याच्या येऊरच्या जंगलात आणि नागला बंदराजवळच्या रानातही विविध रानफुले सहज बघायला मिळतात. महाराष्ट्राच्या या पुष्प वैभवाचे दर्शन ठाणेकरांना एकाच ठिकाणी घडणार आहे ते ठाणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या ‘वृक्षवल्ली’या उपक्र मामध्ये. बहर आणि फुलवा या पुस्तकांचे लेखक, सुप्रसिध्द वनस्पती अभ्यासक श्रीश क्षिरसागर, तसेच ठाण्यातील गिरिश वझे , अविनाश भगत, वेदवती पडवळ, केदार भट, अजित जोशी, श्याम घाटे, विवेक काळे या छायाचित्रकारांची छायाचित्रे या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे यातून वनस्पती विश्वातील विविध विभागांची ओळख सर्वसामान्यांना व्हावी अशी याची रचना करण्यात आली आहे. किटकभक्षी वनस्पती, परोपजिवी वनस्पती, औषधी वनस्पती, मौसमी वनस्पती, रानातील वृक्ष, याच बरोबर वनस्पती आणि किटक यांचे परस्पर संबंध, फुल म्हणजे कायÞ? फुलांची उत्पत्ती याबाबतचे माहितीपूर्ण फलक छायाचित्रांसह इथे असणार आहेत. त्यामुळे आपल्याच अवती भवती असलेल्या आणि तरिही आपल्याला परिचित नसलेल्या हिरव्या जगाची ओळख आपल्याला होईल. या प्रदर्शनच्या निमित्ताने होप नेचर ट्रस्ट जवळ जवळ तेरा वर्षांनी ‘वृक्षवल्ली’मध्ये पुन्हा सहभागी होणार आहे. २००१ साली पहिले वृक्षवल्ली प्रदर्शन ठाणे महापालिकेने होपच्या सहभागानेच सुरू केले होते. आता शुक्रवार १२ ते रविवार १४ जानेवारी या काळात रेमंड कंपनीच्या मैदानावर होणाºया वृक्षवल्लीला भेट द्या आणि वनस्पतींच्या जगात फेरफटका मारा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकenvironmentवातावरण