‘आरोग्यमय दिवाळी साजरी करा’; एकनाथ शिंदेंनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2020 23:35 IST2020-11-13T23:35:48+5:302020-11-13T23:35:59+5:30

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘Celebrate Healthy Diwali’; Happy Diwali from Eknath Shinde | ‘आरोग्यमय दिवाळी साजरी करा’; एकनाथ शिंदेंनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

‘आरोग्यमय दिवाळी साजरी करा’; एकनाथ शिंदेंनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

ठाणे :  यंदाची दिवाळी सर्वांनी आपापल्या घरी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून सुरक्षितपणे साजरी करू या. स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला सुरक्षित ठेवू या, असे आवाहन करून पालकमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोनाबाधित आणि कोमॉर्बिड लोकांना धुराचा त्रास होण्याची शक्यता असल्याने मोठ्या आवाजाच्या व प्रदूषण निर्माण करणाऱ्या फटाक्यांचा वापर कमीतकमी करण्याचेही आवाहन शिंदे यांनी केले आहे.

‘फटाके फोडताना सावधान’

फटाके फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. सॅनिटायझर हे ज्वलनशील असल्याने फटाक्यांजवळ सॅनिटायझरचा वापर करू नका, असे आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केले.

Web Title: ‘Celebrate Healthy Diwali’; Happy Diwali from Eknath Shinde