शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

सीडीआर प्रकरण : मुंबईच्या आणखी एका गुप्तहेरास अटक, यवतमाळ पोलिसांकडून नव्याने चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 2:39 AM

बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात ठाणे पोलिसांनी मंगळवारी मुंबई येथील एका गुप्तहेरास अटक केली. किर्तेश कवी (४४) असे अटक करण्यात आलेल्या खासगी गुप्तहेराचे नाव आहे.

ठाणे : बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात ठाणे पोलिसांनी मंगळवारी मुंबई येथील एका गुप्तहेरास अटक केली. किर्तेश कवी (४४) असे अटक करण्यात आलेल्या खासगी गुप्तहेराचे नाव आहे. या अटकेमुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या १0 झाली आहे. ठाणे न्यायालयाने किर्तेशला १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच या प्रकरणी यवतमाळ पोलिसांनी नव्याने चौकशी सुरू केली आहे.कुणाच्याही मोबाइल नंबरचा सीडीआर बेकायदेशीरपणे मिळवून तो १0 ते १२ हजार रुपयांमध्ये विकणाºया टोळीचा पर्दाफाश गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक १ने गत महिन्यात केला. या प्रकरणी देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित आणि काही खासगी गुप्तहेरांसह नऊ आरोपींना पोलिसांनी अटक केली. मंगळवारी या प्रकरणी खासगी गुप्तहेर किर्तेशला अटक केली. किर्तेश गोरेगाव येथे स्वत:ची गुप्तहेर संस्था चालवतो. सीडीआर प्रकरणामध्ये पोलिसांनी कोपरखैरणे येथील प्रशांत श्रीपाद पालेकर याला आधीच अटक केली होती. किर्तेश कवी हा पालेकरला सीडीआर पुरवायचा, अशी पोलिसांची माहिती आहे.पोलीस या प्रकरणाचा सूत्रधार सौरव साहू याच्या शोधात आहेत. त्याच्या अटकेसाठी गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक १चे पथक नुकतेच दिल्ली येथे जाऊन आले. मात्र सौरव पोलिसांच्या हाती लागला नाही. सौरवच्या अटकेतून या प्रकरणाशी संबंधित बहुतांश प्रश्नांची उकल होऊ शकेल असा पोलिसांना विश्वास आहे. सौरव साहूने त्याच्या कामासाठी मुंबईत काही हस्तक नेमले होते. किर्तेश कवी हा त्यापैकीच एक आहे. किर्तेशच्या अटकेने सौरवपर्यंत पोहोचणे आणखी सोयीचे होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.तर दुसरीकडे या प्रकरणात यवतमाळ पोलिसांनी अंतर्गत चौकशी सुरू केली असून आवश्यकतेनुसार या प्रकरणी वेगळा गुन्हा दाखल करण्याची भूमिकाही यवतमाळ पोलिसांनी स्पष्ट केली आहे.पोलिसांनी अजिंक्य नागरगोजे याला मागील आठवड्यात पुण्यातून अटक केली होती. अजिंक्य मूळचा यवतमाळचा असून, त्याने सीडीआर मिळवण्यासाठी यवतमाळ पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयीन ई-मेल आयडीचा दुरूपयोग केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. अजिंक्य स्वत: सायबर तज्ज्ञ असून, यवतमाळ पोलिसांची वेबसाईट त्यानेच तयार केली होती. वेबसाईट तयार करताना त्याने यवतमाळ पोलिसांची संगणकीय प्रणाली हाताळली होती. त्या वेळी पोलीस अधीक्षकांचा कार्यालयीन ई-मेल आयडी एक लिपिक वापरत असताना, त्याचा पासवर्ड अजिंक्यने चोरून बघितला होता. पुढे याच ई-मेल आयडीचा वापर करून अजिंक्यने वेगवेगळ्या मोबाइल कंपन्यांकडून १११ सीडीआर मिळवले. अजिंक्यने या सर्व कारनाम्यांची कबुली ठाणे पोलिसांजवळ दिली आहे. मात्र त्यावर विसंबून न राहता, यवतमाळ पोलिसांनी स्थानिक स्तरावर अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.वेबसाईट तयार करण्याच्या निमित्ताने अजिंक्यने यवतमाळ पोलिसांची संगणकीय प्रणाली हाताळली होती. या प्रणालीचा वापर करून तो आणखी काही गैरफायदा घेत होता का, याची चौकशी यवतमाळ पोलीस करीत आहेत. नागरगोजे सीडीआर मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी यवतमाळ पोलीस अधीक्षकांच्या ई-मेल आयडीवरून संबंधित मोबाइल कंपनीला ई-मेल पाठवायचा. त्यानंतर मोबाइल कंपनीने पाठविलेला सीडीआर डाऊनलोड करण्यासाठी पुन्हा ई-मेल सुरू करायचा. कार्यालयीन ई-मेलचा अन्य ठिकाणाहून एवढ्या वेळा वापर होत असताना हा प्रकार पोलीस अधीक्षक कार्यालयातील संबंधित कर्मचाºयांच्या निदर्शनास कसा आला नाही, या प्रश्नावरही चौकशी सुरू असल्याचे यवतमाळचे पोलीस अधीक्षक राजकुमार यांनी सांगितले.अलर्ट सुविधा नसल्याने घोळकुणाचेही जी-मेल अकाउंट त्याच्या नेहमीच्या संगणक अथवा मोबाइल फोनव्यतिरिक्त अन्यत्र कुठूनही हाताळले गेले की संबंधित व्यक्तीच्या जी-मेलवर लगेच अलर्ट येतो. गुगलने ती विशेष सुविधा खातेदारांना दिली आहे.शासनाच्या ई-मेल सेवेमध्ये तशी कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे आरोपी नागरगोजे याने पोलीस अधीक्षकाचा कार्यालयीन ई-मेल वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणांहून हाताळला तरी खातेदारास अलर्ट मिळाला नाही. शासकीय ई-मेल यंत्रणेतील ही उणीव आरोपीच्या पथ्यावर पडली. ही उणीव अतिशय गंभीर असून, ती शासनाच्या निदर्शनास आणून देऊ, असे राजकुमार यांनी सांगितले.सायबरतज्ज्ञ म्हणून नागरगोजे याने पोलिसांना सायबर प्रशिक्षण दिले आहे. त्यानेच असा गैरप्रकार करावा, हे कमालीचे धक्कादायक आहे. सीडीआर प्रकरणात स्थानिक स्तरावर काय चुका झाल्या किंवा भविष्यात काय खबरदारी घेण्याची गरज आहे, याची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. या चौकशीनुरुप कारवाईची दिशा निश्चित केली जाईल.- राज कुमार, पोलीस अधीक्षक, यवतमाळ

टॅग्स :ArrestअटकCrimeगुन्हा