ठाण्यात ठेकेदार व मेट्रोच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 01:32 PM2019-11-30T13:32:33+5:302019-11-30T13:34:44+5:30

मेट्रोच्या ठेकेदाराकडून करण्यात आलेल्या वृक्षतोडीवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

case has been registered against the contractor and metro officers in thane | ठाण्यात ठेकेदार व मेट्रोच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

ठाण्यात ठेकेदार व मेट्रोच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

Next

ठाणे - रात्रीच्या अंधारात तीन हात नाका येथे मेट्रोच्या ठेकेदाराकडून करण्यात आलेल्या वृक्षतोडीवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महापौर नरेश म्हस्के यांनी या विषयावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश वृक्षप्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार शुक्रवारी रात्री वरिष्ठ उद्यान निरीक्षक केदार पाटील यांनी ठेकेदार व मेट्रोच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. 

दरम्यान पर्यावरणप्रेमी असलेले महापौर नरेश म्हस्के हे या प्रकरणी गुन्हा दाखल झाला की नाही याबाबत सातत्याने महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाकडे विचारणा करीत होते त्यानुसार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. परवानगी असल्याचा दावा करुन मेट्रोच्या ठेकेदाराकडून रात्रीच्या अंधारात वृक्षतोड करण्यात आली. या वृक्षतोडीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेतली. त्यावेळी महापौरांनी देखील अशा प्रकारे परस्पर रात्रीच्या वेळी झाडे तोडण्याच्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना हा प्रकार घडल्याबाबत प्रकरणी तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश वृक्षप्राधिकरण विभागाला दिले. त्यानुसार रात्री उशिरा नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून प्रकरणी पुढील तपास करुन पाठपुरावा करण्याच्या सूचनाही महापौर यांनी दिल्या आहेत.

पर्यावरणावर घाला घालून ऱ्हास करणाऱ्यांना प्रशासनाने पाठीशी घालू नये असेही यावेळी महापौर यांनी नमूद केले. मुंबईत देखील मेट्रोसाठी एका रात्रीत हजारो झाडांची कत्तल करण्यात आली, याची दखल नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ ग्रहण केल्यानंतर लगेचच वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे. याच पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाचे आदेश डावलून अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी असे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले आहे.
 

Web Title: case has been registered against the contractor and metro officers in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.