मीरारोड व महापालिका मुख्यालयातील बेकायदा आंदोलनाप्रकरणी महापौरांसह अनेक नगरसेवकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 03:48 PM2021-10-22T15:48:29+5:302021-10-22T15:49:04+5:30

अनेक नगरसेवक व २०० ते २५० कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल 

Case filed against mayor and several corporators in connection with illegal agitation at Mira Road and NMC headquarters | मीरारोड व महापालिका मुख्यालयातील बेकायदा आंदोलनाप्रकरणी महापौरांसह अनेक नगरसेवकांवर गुन्हा दाखल

मीरारोड व महापालिका मुख्यालयातील बेकायदा आंदोलनाप्रकरणी महापौरांसह अनेक नगरसेवकांवर गुन्हा दाखल

Next

मीरारोड - मीरारोड व महापालिका मुख्यालयात सत्ताधारी भाजपाने पाण्यावरून कोरोना संसर्ग , मनाई आदेश, नोटिसांचे उल्लंघन करून केलेल्या बेकायदेशीर आंदोलना प्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात महापौर ज्योत्सना हसनाळे, माजी आमदार नरेंद्र मेहतांसह भाजपाचे अनेक नगरसेवक व २०० ते २५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तर दुसरीकडे मनसे सह सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजपाला राजकीय फायदा पोहचवण्यासाठी आंदोलन करू दिल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे . 

गुरुवारी पालिकेतील सत्ताधारी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी पाण्यावरून मीरारोडच्या सिल्वर पार्क वरून चेकनाका असा मोर्चा काढत नंतर अंधेरी एमआयडीसी बाहेर आंदोलन करण्याचे जाहीर केले होते .  परंतु प्रत्यक्षात सिल्व्हरपार्क नाक्यावरील मुख्य रस्त्यातच भला मोठा स्टेज व मंडप बेकायदेशीर उभारला होता. गुरुवारी सकाळी पोलिसांनी तो स्टेज व मंडप काढायला लावून रस्ता मोकळा केला. 

सिल्वर पार्क पाण्याच्या टाकी बाहेरील मोकळ्या जागेत बेकायदा स्टेज उभारून तेथे सभा घेण्यात आली . सभेत महाविकास आघाडी सरकार सह स्थानिक आमदार , खासदार आदींवर टीकेची झोड उठवण्यात आली . चेकनाका पर्यंत मोर्चा व एमआयडीसी अंधेरी येथील आंदोलन न करता महापौर , मेहता आदींसह नगरसेवक , पदाधिकारी हे थेट महापालिका मुख्यालयात आले . दुसऱ्या मजल्यावर पुन्हा घोषणाबाजी व आरोप करत आंदोलन करत मटकी फोडण्यात आली . 

वास्तविक पोलिसांनी आधीच अनेकांना कोरोना संसर्गाचा धोका , जमावबंदी असल्याने प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती . तसेच कोणतीच परवानगी दिली नव्हती . तरी देखील बेकायदा आंदोलन केल्या प्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात महापौर, मेहतांसह उपमहापौर हसमुख गेहलोत , सभागृह नेता प्रशांत दळवी, स्थायी समिती सभापती दिनेश जैन , ध्रुवकिशोर पाटील , वीणा भोईर , डिंपल मेहता , संजय थेराडे, शानू गोहिल, अनिल भोसले, वर्षा भानुशाली . नयना म्हात्रे आदी भाजपाचे नगरसेवक , २०० ते २५० पदाधिकारी - कार्यकर्ते आदींवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

पोलिस आणि पालिका संरक्षणा खाली भाजपाचे आंदोलन 

पोलिसांनी भाजपाच्या आंदोलना बाबत पक्षपातीपणा केला आहे . अन्य पक्ष वा सामाजिक कार्यकर्त्यांवर त्वरित कारवाई केली जाते पण भाजपाच्या आंदोलकांना त्वरित ताब्यात घेण्या ऐवजी त्यांना बेकायदेशीर सभा घेऊ दिली व नंतर त्यांना पालिकेत सुद्धा आंदोलन करू दिले असा आरोप मनसे सह सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे . मनसेने लेखी तक्रार केली आहे . 

महापालिकेने देखील पालिका मुख्यालयात बेकायदा आंदोलन करत सरकारी कामात अडथळा व शासकीय अधिकाऱ्यांना चोर म्हणत खोटे आरोप केल्या प्रकरणी गुन्हा दाखल का केला नाही ? भर रस्त्यात बेकायदा मंडप उभारल्या प्रकरणी गुन्हा दाखल का नाही ? असे सवाल केले जात आहेत . पोलीस आणि पालिका संरक्षणा खाली भाजपाचे आंदोलन असल्याची टीका होत आहे.

Web Title: Case filed against mayor and several corporators in connection with illegal agitation at Mira Road and NMC headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.