आता बालकांची काळजी घेणो अत्यावश्यक :  स्मिता ढाकणे यांचे प्रतिपादन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 05:23 PM2019-11-20T17:23:55+5:302019-11-20T17:26:04+5:30

बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताह जनजागृती कार्यक्रम दिव्यांग कला केंद्रात पार पडला

Care of children is essential now: Smita Dhakane's rendition | आता बालकांची काळजी घेणो अत्यावश्यक :  स्मिता ढाकणे यांचे प्रतिपादन 

आता बालकांची काळजी घेणो अत्यावश्यक :  स्मिता ढाकणे यांचे प्रतिपादन 

Next
ठळक मुद्देआता बालकांची काळजी घेणो अत्यावश्यक :  स्मिता ढाकणे दिव्यांग कला केंद्रात बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताहाची सांगता बालक ही राष्ट्राची संपत्ती आहे

ठाणे: बालक ही राष्ट्राची संपत्ती आहे. भारतात सवार्धिक लोकसंख्या ही तरुण आणि बालकांची असल्याने बालकांचे अधिकार आणि हक्क तयार होत गेले. सामाजिक स्तर हा खाली खाली येत आहे. त्यामुळे आता बालकांची काळजी ही घेतली गेली पाहिजे. बालकांवर कोणाकडूनही अत्याचार होऊ शकतो असे ठाणो लोहमार्ग पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी सांगितले.  ठाणे लोहमार्ग पोलीस आणि दिव्यांग कला केंद्राच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी दिव्यांग कला केंद्रात बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताहाची सांगता करण्यात आली.

                यावेळी बालक आणि पालक यांना मार्गदर्शन करताना ढाकणे यांनी पोक्सो कायद्याची माहिती दिली. त्या म्हणाल्या, लहान मुलांचे लैंगिक शोषण मग ते कोणत्याही प्रकारे असो त्यासाठी पोक्सो कायदा काम करतो. आपल्या मुलाच्या वागण्यातील बदल त्यांच्या पालकांनी ओळखायला हवा इतके दृढ नाते पाल्य आणि पालकांमध्ये असायला हवे. बालकांवर अत्याचार करणारी व्यक्ती ही घरातलीच असते. त्यात बहुतांशी पुरूषवर्ग असतात. कायद्याची अंमलबजावणी करताना नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला नाही तर आम्हीही काही करु शकणार नाही. बालकामगार कायद्याविषयी त्यांनी यावेळी माहिती दिली. दिव्यांग मुलांची काळजी जास्त घेणो आवश्यक आहे. सुरूवातीलाच प्रतिकार केला तर पुढे अत्याचार करणा:याची हिम्मत होत नाही. अन्याय सहन केला तर तो अन्याय पुढेही होतो. पालक आणि मुलांमध्ये सुसंवाद असण्याची गरज आहे. दिव्यांग मुलांसाठी काम करणा:या शिक्षण विभागाच्या स्वाती विचारे यांनी सांगितले की, सुरूवातीलाच नाही म्हणायला शिका, सुरूवातीलाच अन्याय सहन केला तर तो पुढे होत जातो. एखादी गोष्ट का चांगली नाही हे आपल्या पाल्याला पटवून द्या असा सल्ला देत दिव्यांग मुलांचे त्यांनी कौतुक केले. बालकांना शिक्षणाचा, खेळण्या - बागडणचा, योग्य आरोग्य मिळण्याचा, स्वत:चे मत मांडण्याचा, स्वत:चा विकास करण्याचा अधिकार आहे असे जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या शुभांगी जगताप यांनी सांगितले. चाईल्ड लाईनसाठी काम करणा:या सोनाली उपाल यांनी 1क्98 विषयी माहिती दिली. या क्रमांकावर संपर्क केल्यावर तुम्ही बालकांसाठी सुरक्षितता मागू शकता आणि ही लाईन 24 तास, सातही दिवस सुरू असते. या लाईनवर केवळ स्वत:च्या बालकासाठी नव्हे तर इतरांच्या बालकांसाठी ही मदत मागू शकता असे आवाहन त्यांनी केले. दिव्यांग कला केंद्राच्या मुख्याध्यापिका संध्या नाकती यांच्या हस्ते दिव्यांग मुलांनी काढलेले चित्र देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. केंद्राचे प्रमुख किरण नाकती यांनी प्रस्तावना आणि निवेदन केले तर ठाणे लोहमार्ग पोलीस, गोपीनीय विभागाचे अतुल धायडे यांनी आभार प्रदर्शन केले. शेवटी दिव्यांग कला केंद्राच्या विद्याथ्र्यानी नृत्य सादर करुन उपस्थितांचे मन जिंकले.

Web Title: Care of children is essential now: Smita Dhakane's rendition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.