भिवंडीत तीन विद्यार्थ्यांना धडक देऊन कार चालक फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 18:30 IST2018-02-06T18:26:42+5:302018-02-06T18:30:08+5:30

Car driver abducted by three students in the auto-rickshaw | भिवंडीत तीन विद्यार्थ्यांना धडक देऊन कार चालक फरार

भिवंडीत तीन विद्यार्थ्यांना धडक देऊन कार चालक फरार

ठळक मुद्देशाळेत जाणा-या तीन विद्यार्थ्यांना भरधाव जाणाºया कारने दिली धडकअपघातानंतर घटनास्थळी कारचालक न थांबता तो पळून गेला अतिदक्षता विभागात उपचार सुरू



भिवंडी : तालुक्यातील कल्याण-भिवंडी मार्गावरील कोन गावच्या हद्दीत शाळेत जाणाºया तीन विद्यार्थ्यांना भरधाव जाणाºया कारने आज सकाळी धडक दिल्याने तीन मुलांना गंभीर दुखापती झाल्या असुन अपघातानंतर घटनास्थळी कारचालक न थांबता तो पळून गेला.
अक्षदा दिलीप मुकादम(५वी),पायल म्हात्रे(६वी) व तुषार म्हात्रे(३री)असे जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नांवे असुन ते पिंपळास गावातील म्हात्रेनगरमधून आज मंगळवार रोजी सकाळी कोनगावातील आठगाव प्राथमिक शाळेत जात होते.गोवे टोलनाका येथील फर्निचर दुकानासमोर या तिघांना कल्याणहून येणाºया भरधाव कारने धडक दिल्याने त्यांच्या डोक्यास व पायास गंभीर दुखापत झाली. या तिघांना परिसरांतील नागरिकांनी उचलून कोन गावातील वेद हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असुन त्यांच्यावर अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहेत.अपघात झाल्यानंतर कारचालक कारसह घटनास्थळावरून फरार झाला असुन या प्रकरणी नागरिकांमध्ये तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना ठोकर मारणाºया कारचा पोलीस कसोशीने शोध घेत आहेत. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात दिलीप यशवंत मुकादम याने तक्रार दिली आहे.

Web Title: Car driver abducted by three students in the auto-rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.