शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांचा डोअर टू डोअर प्रचार सरदाराविना काँगेस, उद्धवसेना, मनसे उमेदवार रिंगणात

By सदानंद नाईक | Updated: January 10, 2026 19:21 IST

उल्हासनगर महापालिका निवडणूकीत भाजपाचे ऐकून ७८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यानंतर शिंदेसेनेने ६९ ठिकाणी धनुष्यबाण चिन्हावर उमेदवार रिंगणात उतरले असून त्यामध्ये ओमी टीम समर्थक उमेदवारांचा समावेश आहे.

- सदानंद नाईक, उल्हासनगर उल्हारनगर शहरात खरी लढत भाजप विरुद्ध शिंदेसेना, ओमी टीम व साई पक्षाच्या युती सोबत असलीतरी, अनेक ठिकाणी उद्धवसेना, काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी अजित पवार यांच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेत त्यांच्यासमोर आवाहन निर्माण केले. सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी डोअर टू डोअर प्रचारावर भर दिल्याचे चित्र आहे.

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजपाचे ऐकून ७८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यानंतर शिंदेसेनेने ६९ ठिकाणी धनुष्यबाण चिन्हावर उमेदवार रिंगणात उतरले असून त्यामध्ये ओमी टीम समर्थक उमेदवारांचा समावेश आहे. 

इतर कोणत्या पक्षाचे किती उमेदवार रिंगणात?

स्थानिक साई पक्षाचे ११ ठिकाणी टीव्ही चिन्हावर तर प्रभाग क्रं-१८ मध्ये पीआरपी पक्षाचे ४, तर प्रभाग क्रं-१२ मध्ये ओमी टीम समर्थक ४ ठिकाणी विविध चिन्हावर निवडणूक रिंगणात आहेत. विरोधी पक्षातील उद्धवसेना-४२, काँग्रेस-३२ व मनसे ७ ठिकाणी रिंगणात आहेत. 

वंचित बहुजन आघाडीचे -२६, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे -४६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी स्थानिक नेत्याच्या मदतीने डोअर टू डोअर प्रचार सुरू केला. तर काही जणांनी रॅलीचे आयोजन करून ताकद दाखवित आहेत.

प्रचाराचा शेवटचा रविवार दणाणून जाणार

निवडणुक प्रचार रॅलीत महिला वर्गाने डोअर टू डोअर प्रचारात आघाडी घेतली असून करताना उमेदवार व समर्थकांच्या डोक्यावर पक्षाच्या टोप्या, मफरल, उपरणे, झेंडे, पोस्टर, बॅनर, स्पीकर, छोटा हत्ती टेम्पो, ऑटो रिक्षा, तीन चाकीवर साउंड आदी लवाजमा घेऊन लहान लहान गल्ली बोळीतून मतांसाठी फिरत आहेत. 

सकाळी १० ते दुपारी २ तर सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रचाराची रणधुमारी उडाली आहे. उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुखांनी ऐण वेळी भाजपात उडी घेतल्याने, त्या उमेदवारावर सरदार विना लढावे लागतानाहे. हीच परिस्थिती काँग्रेस, मनसे व राष्ट्रवादी अजित पवार या विरोधी पक्षाची सरदार विना सैनिक लढण्यासारखी झाली आहे. वंचित बहुजन आघाडीने १० पेक्षा जास्त तीन चाकी रिक्षा एकाच प्रभागात प्रचारात घेऊन प्रचारात हायटेक भरारी घेतली आहे.

समस्या त्याच 

निवडणुकीत सर्वच उमेदवार शुद्ध व स्वच्छ मुबलक पाणी, साफसफाई, रस्ते, नाले, अवैध बांधकामे नियमित करणे, तुंबलेल्या नाल्या, आरोग्य आदी सुविधा देण्याची अभिवचन देत आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Ulhasnagar Election: Candidates Campaign Door-to-Door; Key Leaders Missing from Fray

Web Summary : Ulhasnagar's municipal election sees BJP vs. Shinde Sena alliance, with other parties actively campaigning. Candidates focus on door-to-door outreach, but key leaders are notably absent from Congress, Shiv Sena (UBT), and MNS efforts. Parties promise improved amenities.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Ulhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस