कॅनडातील वरांचे डोंबिवलीतील आई-वडिलांनी लावले ‘ऑनलाइन शुभमंगल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:26 IST2021-06-29T04:26:46+5:302021-06-29T04:26:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली: कोरोना संकट आणि त्यामुळे लागू झालेल्या बंधनांमुळे अनेकांचे विवाह सोहळे रखडले आहेत. डोंबिवलीमध्ये एका ‘शुभमंगल ...

कॅनडातील वरांचे डोंबिवलीतील आई-वडिलांनी लावले ‘ऑनलाइन शुभमंगल’
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: कोरोना संकट आणि त्यामुळे लागू झालेल्या बंधनांमुळे अनेकांचे विवाह सोहळे रखडले आहेत. डोंबिवलीमध्ये एका ‘शुभमंगल ऑनलाइन’ सोहळ्याची चर्चा रंगली आहे. या लग्नात वधू, वर दोघेही कॅनडाला होते. वराच्या वडिलांनी पुढाकार घेत डोंबिवलीहून भटजीच्या मदतीने व मोजक्या नातेवाइकांच्या ऑनलाइन उपस्थितीत आपल्या एकुलत्या एका मुलाचा विवाह लावून दिला.
मंगलाष्टका व सर्व धार्मिक विधी ऑनलाइन पार पडले. जोडप्याच्या नातेवाइकांनी यूट्यूब आणि फेसबुक पेजच्या लिंकद्वारे लग्नाला उपस्थिती लावली व अक्षदा टाकल्या.
डोंबिवली पूर्वेकडील भोपर गाव परिसरात राहणाऱ्या डॉ. हिरामण चौधरी (बीएचएमएस) यांचे पुत्र मूळ डोंबिवलीकर असलेल्या भूषणचे. सात वर्षांपूर्वी भूषण यांनी उच्च शिक्षणासाठी कॅनडा येथे जाण्याचा निर्णय घेतला. तेथेच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना नोकरी लागली व नोकरीमुळे त्यांनी कॅनडात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. याचदरम्यान त्यांचे मनजीत कौर या तरुणीशी प्रेमसंबंध जुळले. दोघांनीही आपल्या कुटुंबाला विवाहाची इच्छा बोलून दाखवली.
चौधरी व कौर कुटुंबाने या दोघांना विवाहाची परवानगी दिली. मात्र मार्च २०२० पासून कोरोनामुळे त्यांना भारतात येता येत नव्हते तर त्यांच्या कुटुंबीयांना कॅनडात जाता येत नव्हते. फोनवर लग्नाची बोलणी झाली. मात्र कोरोना व लॉकडाऊनमधील बंधने यामुळे दोन वर्षांपासून तारीख निश्चित होत नव्हती. अखेर या दोन्ही कुटुंबांनी आपल्या मुलांचा ऑनलाइन विवाह करण्याचे ठरवले.
चौधरी व कौर कुटुंबांनी लग्नासाठी लागणारे सर्व सामान कुरिअरच्या माध्यमातून भूषण यांना कॅनडा येथे घरपोच केले. भटजींनी डोंबिवलीत बसून कॅनडातील भूषण व हरदीप यांना ऑनलाइन लग्नाचे विधी सांगत त्यांच्याकडून करवून घेतले. नातलगांनी आपापल्या घरात बसून अक्षदा टाकल्या व अखेर ऑनलाइन विवाह संपन्न झाला. दोन्ही कुटुंबातील ज्येष्ठांचे ऑनलाइन आशीर्वाद घेतले. एका वाहिनीवर ‘शुभमंगल ऑनलाइन’ ही मालिका सध्या सुरू आहे. परंतु प्रत्यक्षात झालेल्या या विवाहाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. कोरोना काळात अशाच पद्धतीने विवाह सोहळा करण्याचे आवाहन चौधरी यांनी केले.
----------
फोटो।मिळतील
..........
वाचलोे