शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेच्या प्रचारात नगरसेवक मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 02:37 IST

महापालिका क्षेत्र; बैठका, रॅलींवर भर; भाजपची संख्या मात्र कमीच

- अजित मांडके ठाणे : ठाणे लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. प्रचारासाठी आता काहीच दिवस उरले असून महापालिकेतील नगरसेवकांनी जोर लावण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेसाठी भाजपचे चारच नगसेवक सारखे सारखे दिसत आहेत. तर राष्टÑवादीच्या उमेदवारांकडे मात्र काँग्रेसच्या एकाच नगरसेवकाचे बळ आहे. असे असले तरी इतर पदाधिकारी मात्र सक्रीय झाल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांनीही प्रभागात बैठका, रॅलींवर भर दिला आहे. मात्र, उन्हाच्या तडाख्यामुळे प्रचारात जोर कमी आहे.ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ६५ आणि भाजपचे २३ नगरसेवक आहेत. तर राष्टÑवादीचे ३५ आणि काँग्रेसचे तीन नगरसेवक आहेत. २०१७ मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी केली, तर शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरा गेले होते. परंतु , आता लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपाची युती झाल्याने एकत्रितपणे प्रचार सुरू आहे. लोकसभेची जागा शिवसेनेकडे असल्याने भाजपला त्यांचा प्रचार करावा लागत आहे. परंतु ज्या पद्धतीने सक्रीय होणे अपेक्षित होते. तेवढे ते झालेले नाहीत. दुसरीकडे राष्टÑवादीकडे ३५ नगरसेवक असले तरी या मतदार संघात आठच नगरसेवक येत आहेत.युतीची स्थिती?भाजपमध्ये असलेली नाराजी दूर झाली आहे. परंतु, आजही २३ पैकी काही मोजकेच नगरसेवक प्रचारात दिसत आहेत. यामध्ये आमदार संजय केळकरच आघाडीवर असलेल्याचे दिसत आहे. इतर मात्र नगरसेवक भिवंडीत प्रचाराला जातांना दिसत आहेत. त्यामुळे शिवसेनेसाठी ही चिंतेची बाब मानली जात आहे.आघाडीची स्थिती?राष्टÑवादीचे ३५ नगरसेवक असले तरी लोकसभा मतदारसंघात ठाण्यातील केवळ ८ नगरसेवकांचे पाठबळ त्यांना आहे. त्यांच्यावर प्रचार, रॅली, बैठका यांच्यावर जोर द्यावा लागत आहे. तर काँग्रेसचे तीन नगरसेवक असले तरी या मतदारसंघात केवळ एकच नगरसेवक त्यांच्यासाठी उपयोगी ठरत आहे.परंतु, त्याचही हजेरीसुध्दा तुरळक दिसत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे