नाल्यावरील बांधकामे, फुटपाथवरील अतिक्र मणांविरु द्ध पालिकेची मोहीम

By Admin | Updated: October 6, 2015 00:36 IST2015-10-06T00:36:32+5:302015-10-06T00:36:32+5:30

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात नाल्यावरील बांधकामावर आणि फुटपाथवरील अतिक्रमणांविरुध्द सोमवारपासून १० प्रभाग समित्यांमध्ये एकाच वेळी कारवाईचा धडाका पालिकेने सुरु केला आहे

Campaign on the Nallah, on the footpath of the road, by the Municipal Corporation | नाल्यावरील बांधकामे, फुटपाथवरील अतिक्र मणांविरु द्ध पालिकेची मोहीम

नाल्यावरील बांधकामे, फुटपाथवरील अतिक्र मणांविरु द्ध पालिकेची मोहीम

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात नाल्यावरील बांधकामावर आणि फुटपाथवरील अतिक्रमणांविरुध्द सोमवारपासून १० प्रभाग समित्यांमध्ये एकाच वेळी कारवाईचा धडाका पालिकेने सुरु केला आहे. पहिल्याच दिवशी कारवाईत नाल्यावरील १२ बांधकामे तर फुटपाथवरील जवळपास ३२६ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई कायमस्वरुपी असून ती सुरुच राहणार असल्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले. परंतु पहिल्याच दिवशी अशा प्रकारे कारवाईचा धडाका सुरु झाल्याने ती रोखण्यासाठी काही राजकीय नेत्यांचे कारवाई रोखण्यासाठी फोन आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. परंतु कोणाचेही नाव घेण्यास त्यांनी नकार दिला.
शहरातील नाल्यावरील बांधकामे आणि फुटपाथवरील अतिक्रमणे तातडीने तोडण्याबाबत आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त यांना निर्देश दिले होते. त्यानुसार सोमवार पासून या धडक कारवाईला सुरु वात झाली.
या कारवाई अंतर्गत वर्तकनगर प्रभाग समितीत फुटपाथवरील ८ शेड,९ टपऱ्या तर लोकमान्य-सावरकरनगरमध्ये १२ शेड तोडून टाकण्यात आल्या. कळवा नाका ते दत्तवाडी या दरम्यान जवळपास २६ अतिक्रमणे तोडून टाकण्यात आली. नौपाडा प्रभाग समितीत गोखले रोड, नौपाडा पोलिस स्टेशन, राम मारुती रोडसह एकूण १२ ठिकाणी फुटपाथवरील अतिक्रमणे तोडण्यात आली. तर ४ ठिकाणी नाल्यावरील मोठी बांधकामे तोडून टाकण्यात आली.रायलादेवी भागात मुलुंड चेक नाका, पासपोर्ट आॅफीस, वागळे रोड नं.२२ या परिसरातील २८ शेड, ९ टपऱ्या, ६ चायनीज गाडया तोडण्यात आल्या. मानपाडा प्रभागात नाल्यावरील २ बांधकामे तोडण्याबरोबरच ब्रम्हांड, आझादनगर येथील २५ फुटपाथवरील अतिक्र मणे तोडून टाकण्यात आली. कोपरीमध्ये ११ ठिकाणी तर वागळेत ९८ टपऱ्या, १६ चायनीय गाडया, ५८ शेड काढण्यात आल्या. मुंब्रामध्ये जवळपास १५० फुटपाथवरील अतिक्रमणे तोडण्यात आली

Web Title: Campaign on the Nallah, on the footpath of the road, by the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.