दोन महिने वाजलेल्या कॉलर ट्यूनने डिजिटल अरेस्टचे प्रकार घटले

By जितेंद्र कालेकर | Updated: April 4, 2025 12:54 IST2025-04-04T12:49:14+5:302025-04-04T12:54:29+5:30

Thane Crime News: तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले आहे, तुमच्या बँक खात्यात मनी लाँड्रिंगचे पैसे आले आहेत. त्यामुळे तुम्हाला आता डिजिटल अरेस्ट झाल्याचे सांगणारे व्हिडीओ काॅल आल्यास सावध व्हा, अशा काॅलला बळी पडू नका, अशी काॅलर ट्यून केंद्र सरकारनेच सुरू करून सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती केली आहे.

Caller tune played for two months reduced digital arrests | दोन महिने वाजलेल्या कॉलर ट्यूनने डिजिटल अरेस्टचे प्रकार घटले

दोन महिने वाजलेल्या कॉलर ट्यूनने डिजिटल अरेस्टचे प्रकार घटले

- जितेंद्र कालेकर
ठाणे - तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले आहे, तुमच्या बँक खात्यात मनी लाँड्रिंगचे पैसे आले आहेत. त्यामुळे तुम्हाला आता डिजिटल अरेस्ट झाल्याचे सांगणारे व्हिडीओ काॅल आल्यास सावध व्हा, अशा काॅलला बळी पडू नका, अशी काॅलर ट्यून केंद्र सरकारनेच सुरू करून सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर व डिसेंबर महिन्यात अशा डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यांची ठाणे पोलिस आयुक्तालयात असलेली १५ ते २० ही संख्या जानेवारीमध्ये ४ व फेब्रुवारी महिन्यात ३ एवढ्यावर आली. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत घट
सप्टेंबर ते डिसेबर २०२४च्या तुलनेत  जानेवारी व फेब्रुवारी २०२५ या दाेन महिन्यांमध्ये डिजिटल अरेस्टच्या भीतीमध्ये व पर्यायाने गुन्ह्यांत घट झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.   

मोहीम सुरू 
सायबर गुन्हेगारांनी तुमच्या बँक खात्यातून मनी लाँड्रिंग झाले, अशी भीती घालून डिजिटल अरेस्ट करून कोट्यवधी रुपये हडपले. खऱ्याखुऱ्या पोलिसांसारखे व न्यायमूर्तींसारखे दिसणारे गुन्हेगार मोबाइलवरील व्हिडीओ कॉलमध्ये पाहून लोक भुलल्यानंतर केंद्र, राज्याने  जनजागृतीची माेहीम जानेवारीपासून हाती घेतली.  ठाणे आयुक्तालयात सायबर फ्रॉडचे ऑक्टाेबरमध्ये ६३, नाेव्हेंबर २५, डिसेंबरमध्ये ६२ गुन्हे,जानेवारीत ४९, फेब्रुवारीत ३७ गुन्हे दाखल झाले.  

नोव्हेंबर-डिसेंबरमधील गुन्हे
नाेव्हेंबरमध्ये ऑनलाइन फ्राॅडचे ७, साेशल मीडिया फ्राॅड १४,आमिष १, ट्रेडिंगचे १५ असे ३७ गुन्हे दाखल झाले. डिसेंबरमध्ये - फेक लाेनचे १०, आमिषाचे ४,  नोकरीचे आमिष ७, टास्कचे ७, ट्रेडिंगचे २२, आदीसह ६२ गुन्हे  

जाने-फेब्रुवारीमधील गुन्हे
जानेवारीमध्ये फेक लाेन ९, गिफ्ट ५, आमिषचे २, टास्कचे १२, ट्रेडिंगचे १७,  पार्सल- डिजिटल अरेस्टचे ४ असे ४९ गुन्हे तर फेब्रुवारीमध्ये-फेक लाेनचे ५, गिफ्टचे ३, नोकरीचे २, फ्राॅडचे १०, ट्रेडिंगचे १४, अरेस्टचे ३ असे ३७ गुन्हे.  

बळी पडू नका...
अनेक सायबर गुन्हेगार हे व्हिएतनाम, तैवान कंबाेडिया, सिंगापूर, दुबई अशा देशांतून फसवणुकीचे प्रकार करतात. भारतातूनच गेलेले काही गुन्हेगार यामध्ये आहेत. पाेलिस आणि डिजिटल अरेस्टच्या भीतीने बँक बॅलन्सवर डल्ला मारला जाताे. अज्ञान, भीती आणि  लालसा याचा गैरफायदा घेतला जाताे. त्यामुळे प्रलाेभनाला बळी न पडता, भीती न बाळगता अनाेळखी व्हिडीओ आणि व्हाॅट्सॲप काॅलला बळी पडू नका.  
- पराग मणेरे, पाेलिस उपायुक्त, 
आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे शहर

Web Title: Caller tune played for two months reduced digital arrests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.