शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

ठाण्यातील कॅडबरी ते उपवनच्या ३५ कोटींच्या रस्त्यावर खड्डा : मनसेने दिली ४८ तासांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 10:12 PM

ठाण्यातील कॅडबरी कंपनी ते उपवन दरम्यान अनेक अतिक्रमणे हटवून पालिकेने वर्षभरापूर्वीच करोडो रुपये खर्चून रस्ता तयार केला. मात्र, या रस्त्यावर मोठा खड्डा तयार झाला आहे.

ठळक मुद्दे३५ कोटींचा रस्ता तरीही खड्डामनसेने फलक लावून लक्ष वेधलेरस्ता दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा

ठाणे : ठाणे महापालिकेने उपवन ते कॅडबरीदरम्यानच्या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी ३५ कोटींचा खर्च करूनही त्या मार्गावर मोठा खड्डा पडला आहे. यावर पालिकेने ४८ तासांमध्ये दुरुस्ती करण्याची मागणी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने पालिका प्रशासनाकडे केली आहे. ही दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.वर्षभरापूर्वीच ३५ कोटींच्या खर्चातून कॅडबरी कंपनी ते उपवनपर्यंतचा रस्ता ठाणे महापालिकेने तयार केला. यासाठी या मार्गावरील अनेक अतिक्रमणेही पालिकेने हटवली. या मार्गावरील बहुतांश रस्ता हा सिमेंटचा केला आहे. मात्र, मुंबईला पाणीपुरवठा करणा-या वाहिनीवरील पुलाच्या मार्गावरच मोठा खड्डा पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

वर्तकनगरनाका येथे लोकमान्य लंच होम हॉटेलसमोर गेल्या १० ते १५ दिवसांपासून पडलेल्या या खड्ड्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या ठाणे विधानसभा (सांस्कृतिक विभाग) अध्यक्ष प्रसाद भांदिगरे आणि वर्तकनगर शाखाध्यक्ष संतोष निकम यांनी व्यक्त करून तो तातडीने दुरुस्त करण्याची मागणी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. भविष्यात या ठिकाणी अपघात घडून कोणतीही दुर्घटना झाल्यास त्यास वर्तकनगर प्रभाग समितीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच संबंधित अधिकारी हे जबाबदार असतील. त्यामुळे हा खड्डा ४८ तासांमध्ये बुजवला गेला नाही, तर मनसे हा खड्डा बुजवण्याचे काम करेल, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.दरम्यान, जुन्या पुलाचा भाग खचल्याने हा खड्डा पडल्याचे स्पष्टीकरण पालिका प्रशासनाने दिले असून रस्त्याच्या दुरुस्तीची कार्यवाही सुरू केल्याचे पत्रही मनसेला १२ जानेवारी रोजी वर्तकनगर प्रभाग समितीने दिले आहे.

प्रत्यक्षात या ठिकाणी पालिकेने केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा फलक लावला असून कामाला कोणतीही सुरुवात केली नसल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. रेमण्ड कंपनीजवळ वृक्षवल्ली कार्यक्रम तसेच उपवन परिसरातही आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. अशा वेळी या खड्ड्यामुळे अनेकांचे लक्ष वेधले जात असून पालिका प्रशासनाची यात नाचक्की होत असल्याचेही मनसेने म्हटले आहे.