शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्लोबल लॉण्ड्री कोणाची?; खरेदी २१ हजार बेडशीटची, मात्र दररोज धुलाई हाेतेय केवळ ५०० ची!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 07:33 IST

कोविड हॉस्पिटलचे धुलाईचे कंत्राट वादात : नारायण पवार यांनी वेधले लक्ष

ठाणे : कोविड हॉस्पिटल व क्वारंटाइन केंद्रासाठी तब्बल २१ हजार बेडशीटची प्रशासनाकडून खरेदी करण्यात आली. प्रत्यक्षात ६ जुलैपासून दररोज केवळ ५०० अंथरुण-पांघरुणांची धुलाई केली जात आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने २१ हजार बेडशीटची खरेदी करून उधळपट्टी का केली, असा आक्षेप भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी घेतला आहे. ६ जुलैपासून लॉण्ड्री सुरू करणाऱ्या प्रशासनाने मार्चपासून ५ जुलैपर्यंत अंथरुण-पांघरुणांची धुलाई केली नव्हती का, असा सवालही त्यांनी केला आहे.

महापालिकेच्या २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वेबिनार महासभेमध्ये १ सप्टेंबर ते ३१ सप्टेंबरपर्यंतच्या लॉण्ड्रीच्या तीन लाख रुपये खर्चाला कार्योत्तर मंजुरीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. प्रशासनाच्या प्रस्तावानंतर कोविड रुग्णांचे बेडशीट, पिलो कव्हर आदींची (अंथरुण-पांघरुण) धुलाई होत असल्याचे उघड झाले आहे. तत्पूर्वी यासंदर्भात प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

कोरोनाच्या रुग्णांसाठी मार्चच्या अखेरीस क्वारंटाइन सेंटर सुरू करण्यात आले. परिमंडळ-३ अंतर्गत येणाऱ्या भाईंदरपाडा, होरायझन, अक्मे ऑझोन आणि बीएसयूपी कासारवडवली येथील सेंटरमधील रुग्णांनी वापरलेले बेडशीट, पिलो कव्हर, लिनन आदींची (अंथरुण-पांघरुण) प्रत्येक नग २० रुपयांप्रमाणे दररोज ५०० नगांची धुलाई करण्यास आयुक्तांनी ७ ऑगस्ट रोजी मान्यता दिली होती. प्रत्यक्षात त्याआधी ६ जुलै २०२० पासून ग्लोबल लॉण्ड्रीला धुलाईचे काम देण्यात आले होते. यापूर्वी मार्चपासून ५ जुलैर्पयत बेडशीट-पिलोची धुलाई केली नव्हती का, तत्पूर्वी महापालिका प्रशासनाने तब्बल २१ हजार बेडशीटची खरेदी का केली, असा सवालही नारायण पवार यांनी केला आहे.

ग्लोबल लॉण्ड्री कोणाची?या कामासाठी ग्लोबल लॉण्ड्रीची निवड कोणत्या पद्धतीने करण्यात आली, यासंदर्भात निविदा काढण्यात आली होती का, ग्लोबल लॉण्ड्रीचे काम कोणत्या ठिकाणाहून सुरू आहे, अशा अनेक प्रश्नांची प्रशासनाने उत्तरे द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाBJPभाजपा