शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

डोळखांब येथील आदिवासी महिलेचे घर जळून खाक; जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 01:05 IST

Thane News : तालुक्यातील आदिवासी व दुर्लक्षित विभाग असणाऱ्या डोळखांब भागातील सावरपाडा या गावात राहणाऱ्या सोनी संजय वाघ या विधवेच्या घराला बुधवारी पहाटेच्या सुमारास आग लागून घराचे पूर्णपणे नुकसान झाले.

किन्हवली - तालुक्यातील आदिवासी व दुर्लक्षित विभाग असणाऱ्या डोळखांब भागातील सावरपाडा या गावात राहणाऱ्या सोनी संजय वाघ या विधवेच्या घराला बुधवारी पहाटेच्या सुमारास आग लागून घराचे पूर्णपणे नुकसान झाले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.सोनी वाघ यांच्या पतीचे निधन झाले असून त्यांना मूलबाळ नाही. घरात एकट्याच मोलमजुरी करत आहेत. घरातील धान्य व जीवनावश्यक वस्तू जळाल्यामुळे अस्मानी संकट ओढावले आहे. तलाठी यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. एकूण ४८ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी पंचनाम्यात स्पष्ट केले आहे. लवकरच हा अहवाल वरिष्ठांना पाठवून नुकसानभरपाई पीडित महिलेला मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या घटनेची पाहणी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.दरम्यान, या घटनेची माहिती आम्हाला मिळाली असून पाहणी करण्यासाठी इन्स्पेक्टर पाठविले आहेत.  त्यांना अहवाल सादर करण्यासाठी सांगितले आहे. त्यानंतर सरकारकडून जास्तीतजास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रकल्प अधिकारी आर. किल्लेदार यांनी सांगितले. व‌णव्यात झोपडीला आग उन्हाळा सुरू झाला की जंगलांना आगी लावण्याच्या घटना सुरू होतात. असाच प्रकार तालुक्यातील आस्कोत गावातील जंगलात घडला. या ठिकाणी लागलेल्या की लावलेल्या आगीत आदिवासीची झोपडी जळून भस्मसात झाली तर एका मेंढीचा मृत्यू झाला.  आग विझवताना महिला वन कर्मचारी भाजल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आस्कोत गावाच्या जंगलात आदिवासींच्या झोपड्या आहेत . त्यातील शंकर मुकणे यांच्या झोपडीला अचानक आग लागली. वणवा विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असताना महिला वनकर्मचारी अल्पना घोलप या भाजल्या. 

टॅग्स :fireआगHomeघरthaneठाणे