भिवंडीतील वळ गावात घर जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:29 IST2021-05-29T04:29:25+5:302021-05-29T04:29:25+5:30

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील एक मजली असलेल्या कौलारू घरास शुक्रवारी सकाळी आग लागली. आगीत संपूर्ण घर ...

Burn a house in Val village in Bhiwandi | भिवंडीतील वळ गावात घर जळून खाक

भिवंडीतील वळ गावात घर जळून खाक

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील एक मजली असलेल्या कौलारू घरास शुक्रवारी सकाळी आग लागली. आगीत संपूर्ण घर जाळून खाक झाले.

वळ गावातील श्याम भोईर ,जनार्दन भोईर ,निराबाई भोईर व कैलास भोईर यांचे एक मजली कौलारू घर आहे. सकाळी साडेनऊ वाजता वरच्या मजल्यावर शॉर्टसर्किटने अचानक आग लागली व पाहता पाहता आग संपूर्ण घरात पसरली. कैलास भोईर यांच्या दोन मुलांची नुकतीच लग्न झाली असून लग्नात मिळालेला आहेर, वातानुकूलित यंत्र यांनीही पेट घेतल्याने कॉम्प्रेसर मधील गॅसचा स्फोट होऊन संपूर्ण सिलिंग व कौलारू छत कोसळले.

आगीची माहिती कळताच पंचायत समिती सदस्य विकास भोईर यांनी नारपोली पोलिसांसह अग्निशमन दलास पाचारण केले व त्यानंतर तब्बल एक तासाने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी सरपंच राम भोईर ,पोलीस पाटील गिरीधर पाटील यांसह अनेक ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते .या घटनेची नोंद नारपोली पोलिसांनी केली असून मौजे पूर्णाचे तलाठी सुधाकर कामठी यांनी आगीतील नुकसानीचा पंचनामा केला आहे.

Web Title: Burn a house in Val village in Bhiwandi