उल्हासनगरात दिड लाखाची घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने लंपास 

By सदानंद नाईक | Updated: October 8, 2023 19:35 IST2023-10-08T19:35:05+5:302023-10-08T19:35:21+5:30

हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील द्वारलीगावात राहणाऱ्या निलेश निकम यांच्या घराच्या कपाटातून भरदिवसा दिड लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

Burglary worth half a lakh in Ulhasnagar | उल्हासनगरात दिड लाखाची घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने लंपास 

उल्हासनगरात दिड लाखाची घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने लंपास 

उल्हासनगर: हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील द्वारलीगावात राहणाऱ्या निलेश निकम यांच्या घराच्या कपाटातून भरदिवसा दिड लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. 

उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील द्वारलीगावातील प्लाझा इमारती मध्ये निलेश निकम कुटुंबासह राहतात. शुक्रवारी भरदिवसा बंद घरात चोरट्यांनी दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील ५ हजार रुपये रोख रक्कमेसह सोन्या-चांदीचे दागिने असे ऐकून १ लाख ४७ हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरीची घटना उघड झाल्यावर निकम यांनी हिललाईन पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Burglary worth half a lakh in Ulhasnagar