डाेंबिवलीत औषधविक्री दुकानात चाेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:24 IST2021-07-05T04:24:54+5:302021-07-05T04:24:54+5:30
डोंबिवली : डोंबिवलीत चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे. मानपाडा मुख्य रस्त्यावरील शिवाजीनगर पोलीस चौकीसमोरील शिवम नामक औषधविक्री ...

डाेंबिवलीत औषधविक्री दुकानात चाेरी
डोंबिवली : डोंबिवलीत चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे. मानपाडा मुख्य रस्त्यावरील शिवाजीनगर पोलीस चौकीसमोरील शिवम नामक औषधविक्री दुकानाचे शटर तोडून रोकड आणि माल चोरून नेल्याची घटना जूनमध्ये घडली असताना शनिवारी मध्यरात्री गांधीनगर परिसरातील एस. के. मेडिकल दुकानाचे शटरचे दोन्ही लॉक तोडून चोरट्यांनी येथून २० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
शिवम मेडिकलमध्ये जेव्हा चोरी झाली होती तेव्हा तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले होते. मात्र, त्या चोरट्यांचा अद्याप छडा लागलेला नसताना शहरात मेडिकल फोडून चोरी झाल्याची दुसरी घटना घडली आहे. एस. के. मेडिकल दुकानाचे मालक सतीश कदम यांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत दुकानातून १५ हजार ४०० रुपयांची रोकड आणि पाच हजार रुपये किमतीचे अन्य साहित्य चोरीला गेल्याचे नमूद केले आहे. ही घटना शनिवारी रात्री १०.३० ते रविवारी सकाळी ७.४५ या कालावधीत घडली आहे. चोरट्यांकडून मेडिकल दुकाने लक्ष्य केली जात असल्याने शहरात पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी डोंबिवली मेडिकल केमिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
-----------------------------------------------------