शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

लाचखोरी प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांचा सावध पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:36 PM

भिवंडी महापालिकेत लाचलुचपत खात्याने छापा घातला की, संबंधित खात्याचा शिपाई अथवा लिपिकांना या प्रकरणात अडकवल्याच्या घटना आजपर्यंत भिवंडी पालिकेत घडल्या आहेत.

- नितीन पंडितविशेष म्हणजे भिवंडी महापालिकेत आयएएस दर्जाचा अधिकारी आयुक्तपदी नसल्याने येथे आलेल्या जवळपास सर्वच आयुक्तांना येथील लोकप्रतिनिधी आपल्या कौशल्यचातुर्याने आपल्या सोयीनुसारच वळविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नाइलाज म्हणून येथील अधिकारीही भ्रष्टाचार रोखण्यासाठी ठोस प्रयत्न करत नाही. त्यामुळे ‘हम करे सो कायदा’ या उक्तीप्रमाणे येथील सर्वच लोकप्रतिनिधी वागताना दिसतात. याचा फायदा काही चाणाक्ष अधिकारी घेत लोकप्रतिनिधींसह आपला व कंत्राटदारांच्या फायद्याबरोबरच स्थानिक लोकप्रतिनिधींचाही कसा फायदा होईल, याबाबत अधिक विचार करताना दिसतात. त्यामुळे शहर विकासाच्या धोरणांकडे दुर्लक्ष होऊन आपल्या स्वत:च्या विकासाबाबत असे अधिकारी अधिक कार्यरत असल्याचे चित्र भिवंडी प्रशासनात नवे नाही. किंबहुना, ही बाब येथील नागरिकांना माहीत नसावी, असेही नाही.मात्र, ‘रोज मरे त्याला कोण रडे’ असे समजून नागरिक या बाबींकडे दुर्लक्ष करतात. त्यातही जर एखाद्या नागरिकाने या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची माहिती थेट लाचलुचपत विभागाला दिली, तर येथील चाणाक्ष अधिकारी कार्यालयीन शिपायांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोकळे होतात. त्यामुळे भिवंडी महापालिकेत लाचलुचपत खात्याने छापा घातला की, संबंधित खात्याचा शिपाई अथवा लिपिकांना या प्रकरणात अडकवल्याच्या घटना आजपर्यंत भिवंडी पालिकेत घडल्या आहेत. चुकून जर एखाद्या अधिकाºयाला या प्रकरणात सहआरोपी केलेच तर न्यायालयीन लढाईत हे अधिकारी निर्दोष सुटले आहेत.तीन वर्षांपूर्वी महापालिकेच्या शिक्षण विभागात लाचलुचपत विभागाने घातलेल्या छाप्यात लिपिक अविनाश वरघडे हा या प्रकरणात निलंबित झाला आहे. याच कालावधीत जन्ममृत्यू विभागात काम करणारा एकनाथ जाधव यालाही लाचलुचपत विभागाने घातलेल्या छाप्यात संशयावरून आरोपी केले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र, सरकारच्या २०११ च्या जीआरप्रमाणे सध्या त्यांना अकार्यकारी पदावर प्रशासनात रुजू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, लाचलुचपत विभागाने घातलेल्या छाप्यात शिपाई अथवा लिपिकच अडकले जात असल्याने येथील अधिकारीवर्ग त्याबाबतीत सावध पवित्रा घेत असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.भिवंडी-निजामपूर महापालिकेत अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप नागरिकांसह सर्वच राजकीय कार्यकर्ते वेळोवेळी करताना दिसतात. भिवंडी पालिकेच्या होणाºया जवळपास सर्वच कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याच्या बाबी तशा येथील नागरिकांसाठी नव्या नाहीत. मात्र, कंत्राटदार अधिकारीवर्गाशी वेळोवेळी आर्थिक हितसंबंध टिकवून ठेवत असल्याने पालिकेतील वाढत्या भ्रष्टाचाराला आवर घालण्यासाठी सध्यातरी मुहूर्त मिळालेला नाही. त्यातच येथील लोकप्रतिनिधी आपल्या सोयीनुसार कंत्राटदारांशी हातमिळवणी करत असल्याने या भ्रष्टाचाराला आणखीनच खतपाणी मिळते.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग