शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

उल्हासनगरात लाचखोर अधिकाऱ्यांची कंपूशाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 23:43 IST

उल्हासनगर महापालिकेत अपुरा अधिकारीवर्ग असल्याचे निमित्त करून लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडलेल्या लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे महत्त्वाच्या विभागाचा पदभार दिला आहे.

- सदानंद नाईकउल्हासनगर महापालिकेत अपुरा अधिकारीवर्ग असल्याचे निमित्त करून लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडलेल्या लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे महत्त्वाच्या विभागाचा पदभार दिला आहे. याबाबत सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची भूमिका संशयास्पद असून लाचखोरांचा विरोध करण्याऐवजी त्यांना चांगल्या जागी नियुक्ती मिळण्यासाठी तेच राजकीय वजन वापरतात.उल्हासनगर महापालिका, प्रांत कार्यालय, तहसील, भूमापन, पोलीस आदी विभागांतील अधिकारी व कर्मचारी असे गेल्या पाच वर्षांत २१ पेक्षा जास्त व्यक्ती लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. महापालिका विभागातील नगररचनाकार विभाग, प्रभाग अधिकारी, बांधकाम विभाग, विधी विभागातील अधिकारी व कर्मचाºयांची संख्या मोठी आहे. अशा लाचखोर अधिकारी व कर्मचाºयांना महत्त्वाच्या पदांवर व पूर्वी काम करीत असलेल्या विभागात नियुक्त केल्याचे चित्र आहे. ज्या अधिकाºयाचे त्या विभागात व त्या पदामध्ये आर्थिक हितसंबंध गुंतल्याने त्याला अटक झाली, त्याच व्यक्तीला पुन्हा काही महिन्यांत तेथे नियुक्त केल्याने या अधिकाºयांविरुद्ध पुन्हा लाचलुचपत खात्याकडे तक्रार करण्यास कोण कशाला धजावेल, असा प्रश्न आहे. त्यामुळे पारदर्शक कारभाराचा दावा प्रशासन कशाच्या जीवावर करते, असा सवाल नागरिक करीत आहेत.लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात सापडलेले काही अधिकारी हे नगरसेवकांनाही अर्थपूर्ण मार्गदर्शन करीत असल्याने ते त्यांच्या गळ्यातील ताईत आहेत. नगरसेवकांना हवी असलेली कामे मार्गी लावण्यासाठी ते मदत करीत असल्याने त्या अधिकाºयांचा भ्रष्टाचारही नगरसेवकांकरिता क्षुल्लक बाब ठरली आहे. महापालिकेत अशा भ्रष्ट अधिकाºयांचे एक कोंडाळे तयार झाले आहे. नव्याने आयुक्तपदी येणाºया व्यक्तीला ताब्यात घेण्याचा ते प्रयत्न करतात. समजा, एखाद्याने त्या प्रयत्नांना धूप घातली नाही, तर ते आयुक्त टिकणार नाहीत, याचा बंदोबस्त हे मूठभर भ्रष्ट अधिकारी करतात. वर्षानुवर्षे अशा भ्रष्ट अधिकाºयांच्या टोळक्याकडे सूत्रे असल्याने महापालिका आर्थिक अडचणीत सापडली असून हे अधिकारी व त्यांना पाठिंबा देणारे लोकप्रतिनिधी गबर झाले आहेत. उल्हासनगर अनेक समस्यांचे माहेरघर राहण्याचे प्रमुख कारण हे भ्रष्टाचार हेच आहे.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणulhasnagarउल्हासनगरAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग