शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

आश्वासनांच्या बळावर बुलेट ट्रेन रेटणार! मते जाणून घेण्यासाठी गावोगावी धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 5:28 AM

आॅगस्ट २०२२ पर्यंत ती सुरू करणे अशक्य असल्याचे निदर्शनास येताच आता नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने अनोखी शक्कल लढविली आहे.

- नारायण जाधवठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनकरिता जमीन संपादनास शेतकऱ्यांकडून होणारा तीव्र विरोध आहे. परिणामी, आॅगस्ट २०२२ पर्यंत ती सुरू करणे अशक्य असल्याचे निदर्शनास येताच आता नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने अनोखी शक्कल लढविली आहे. गावागावात जाऊन शिक्षण, आरोग्य, रस्ते, मैदाने, पिण्याच्या पाण्यासह इतर कोणत्या समस्या आहेत, कोणत्या सुविधा हव्यात हे जाणून घेत त्या पुरविण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. त्याची सुरुवात पालघर जिल्ह्यातील ७३ गावांतून झाली आहे. यानुसार नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनची पथके या गावांत जाऊन गावकºयांचे म्हणणे ऐकून त्यांना भूसंपादनासाठी राजी करण्यात गुंतली आहेत.लोकांच्या समस्या जाणून घेताना त्यांच्याशी संवाद वाढवणे व भूसंपादनासाठी त्यांना राजी करणे हा कॉर्पोरेशनचा मुख्य हेतू आहे.मात्र, हा केवळ भूसंपादनापुरता विषय नसून बुलेट ट्रेन आल्यावर तिच्या मार्गातील सर्व गावांचा सर्वांगिण विकास कसा करता येईल, हा उदात्त हेतू यामागे असल्याचे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनचे प्रवक्ते धनंजय कुमार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यामुळे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने केवळ शेतकºयांना भूसंपादनासाठी राजी करण्यासाठी ही खेळी खेळत आहे, असे म्हणणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. बुलेट ट्रेन आल्यावर सामाजिक दायित्त्व म्हणून तिच्या मार्गातील गावांचा, तेथील गावकºयांचा सर्वांगिण विकास होणे गरजेचे आहे. कारण त्यांच्याच जमिनीवरून ती जाणार आहे. यामुळे गावकºयांना रोजगारासह शिक्षण, आरोग्य, क्रीडा सुविधांसह रस्ते, समाजमंदिरे, पिण्याचे पाणी यासारख्या मूलभूत सुविधा मिळणे आवश्यक आहे. यामागे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनचा कोणताही स्वार्थ नाही.भूसंपादन कायद्यानुसार या ७३ गावांतील गावकºयांना शासन नियमानुसार आहे, ती नुकसानभरपाई आणि मोबदला दिला जाईलच. परंतु, त्याव्यतिरिक्त त्यांच्याकडूनच त्यांच्या गावात कोणत्या सुविधा हव्यात हे ऐकूण घेत असल्याचे धनंजय कुमार यांनी स्पष्ट केले. त्यानुसार गुजरातसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी जाऊन गावकºयांचे म्हणणे ऐकूण घेण्यात येत असून त्याची सुरुवात पालघर जिल्ह्यातील ७३ गावांपासून झाली असल्याचे ते म्हणाले.अवघी ०.९ हेक्टरच जमीन ताब्यातआतापर्यंत बुलेट ट्रेन जेथून सुरू होणार आहे, त्या मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील 0.9 हेक्टर जमीन वगळता राज्यातील एक इंचही जमीन संपादित करण्यात आलेली नाही.1400हेक्टर जमीन या प्रकल्पाकरिता लागणार10,000कोटी रुपयांचीनॅशनल हायस्पीड कॉर्पोरेशनकडून तरतूदबुलेट ट्रेनमुळे बाधित गावे192 गुजरात120 महाराष्ट्रमात्र, त्यासाठी दोन्ही राज्यांतील जी जमीन जाणार आहे, त्यातील बहुतेक जमीन सुपीक आहे. यामुळे शेतकºयांनी बाजारभावापेक्षा जास्तदर मागितला आहे. तो देण्यास सरकार तयार नसल्याने शेतकºयांचा विरोध दिवसेंदिवस वाढत चालला आहे.शेतकºयांसह शिवसेना-मनसे यासारख्या राजकीय पक्षांच्या तीव्र विरोधामुळे महाराष्ट्रात नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने ही शक्कल लढविल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी