भिवंडीत रेड्याने घातला धुमाकूळ, वाहनांची केली तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 08:42 IST2018-08-23T08:41:58+5:302018-08-23T08:42:19+5:30

भिवंडीत कुर्बानीसाठी आणलेल्या रेड्याने अक्षरश: धुमाकूळ घातल्याची घटना बुधवारी घडली. शहरातील बंदर मोहल्ला परिसरात मालकाच्या तावडीतून सुटून रेड्याने धुमाकूळ घातला. यावेळी पादचा-यांची पळापळ झाली.

bull lose of control in bhiwandi | भिवंडीत रेड्याने घातला धुमाकूळ, वाहनांची केली तोडफोड

भिवंडीत रेड्याने घातला धुमाकूळ, वाहनांची केली तोडफोड

भिवंडी : भिवंडीत कुर्बानीसाठी आणलेल्या रेड्याने अक्षरश: धुमाकूळ घातल्याची घटना बुधवारी घडली. शहरातील बंदर मोहल्ला परिसरात मालकाच्या तावडीतून सुटून रेड्याने धुमाकूळ घातला. यावेळी पादचा-यांची पळापळ झाली.

याचबरोबर, रेड्याने रस्त्यावर असलेल्या वाहनांची तोडफोड केली. यामध्ये दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेचे चित्रीकरण स्थानिक नागरिकांनी आपल्या मोबाइलमध्ये केले.  दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने रेड्याचा बंदोबस्त केला आणि महापोली परिसरामधील एका तबेल्यात ठेवण्यात आले. 

दरम्यान, पोलिसांनी अज्ञात मालकाविरोधात  भारतीय दंडसंहितेच्या कलम 336 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या रेड्याच्या मालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

Web Title: bull lose of control in bhiwandi