शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

Buildin Collapse: नशिबच... इमारतीचा काही भाग कोसळला, बिल्डींंगमधील 8 कुटुंब सुखरुप बाहेर काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 08:55 IST

या घटनेत कोणतीही जीवितहानी व कोणालाही दुखापत झालेली नाही. या इमारतीच्या तळमजल्यावरती एकूण १५ दुकान गाळे असून सदर सर्व गाळ्यातील व्यावसायिकांना पोलीसांच्या मदतीने बाहेर काढण्यात येऊन ती दुकाने बंद करण्यात आली

ठाणे/ मुंब्राः शुक्रवारी रात्री उशिरा डायघर गावातील नाक्याजवळ असलेल्या जयंता अपार्टमेंट या तळ अधिक पाच मजली इमारतीच्या एका बाजूचा काही भाग बाजूच्या चाळीतील घरावर कोसळला. यामुळे उर्वरीत इमारत एका बाजूला झुकलेली आहे. सदर घटनास्थळी डायघर पोलीस अधिकारी व कर्मचारी, टोरंट विद्युत कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व कर्मचारी, १- बाईक ॲम्बुलन्स, दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, दिवा प्रभाग समिती, बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, प्रभाग अधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, अग्निशमन केंद्राचे जवान १- फायर वाहनासह उपस्थित होते. 

या घटनेत कोणतीही जीवितहानी व कोणालाही दुखापत झालेली नाही. या इमारतीच्या तळमजल्यावरती एकूण १५ दुकान गाळे असून सदर सर्व गाळ्यातील व्यावसायिकांना पोलीसांच्या मदतीने बाहेर काढण्यात येऊन ती दुकाने बंद करण्यात आली. इमारतीच्या प्रत्येक मजल्यार प्रत्येकी सहा रूम होते. त्यापैकी पहिल्या मजल्यावरती तीन व दुसऱ्या मजल्यावरती पाच अशी एकूण आठ कुटुंबे राहत असून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. व उर्वरित इमारत यापूर्वीच रिकामी करण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव सदर इमारत सद्यस्थितीला रिकामी करण्यात आलेली असून इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे व सभोवताली धोकापट्टी लावण्यात आली आहे. तसेच इमारतीच्या सभोवताली असलेली चाळीमधील घरे रिकामी करण्यात येऊन तेथील रहिवाशांना पडले गावातील ठा.म.पा. शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, त्यांनी शाळेत स्थलांतर होण्यास नकार देऊन जवळच राहत असलेल्या त्यांच्या नातेवाईकांकडे राहण्याची व्यवस्था स्वतःहून केलेली आहे.

दरम्यान, इमारतीच्या जागेचा मालक श्री. बाबुराव चांगा पाटील. यांनी दिलेल्या माहितीवरून इमारतीमध्ये वास्तव्य करीत असलेल्या रहिवाशांची माहिती पुढील प्रमाणे 

पहिला मजला

रूम नंबर १०१, मालक - श्री. बाबुराव चांगा पाटील.रूम नंबर १०२, मालक - श्री. बाबुराव चांगा पाटील.रूम नंबर १०३, मालक - श्रीमती. वृषाली कृष्णा भोईर.

 दुसरा मजला 

रूम नंबर २०१, मालक - श्री. नामदेव पाटील.रूम नंबर २०२, मालक - श्रीमती. माया पाटील.रूम नंबर २०३, मालक - श्री.बाबुराव पाटील.रूम नंबर २०४, मालक - श्रीमती. सुनिता पाटील.रूम नंबर २०६, मालक - श्रीमती. बायमाबाई पाटील.

 अपुऱ्या प्रकाशामुळे रात्री  सदर इमारती वरील कार्यवाही थांबवण्यात आली. सकाळी इमारतीवर कार्यवाही करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाthaneठाणेPoliceपोलिसFire Brigadeअग्निशमन दल