शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
2
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
3
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
4
भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय...
5
भारतावर विश्वास ठेवा, इतरांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करा; भारत-अमेरिका करारावर गोयल यांची स्पष्टोक्ती
6
"मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी..."; भाजपच्या गिरीश महाजन यांचा आक्रमक पवित्रा
7
IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडकडून सलामी जोडीनंतर डॅरिल मिचेलची बॅट तळपली! टीम इंडियासमोर ३०१ धावांचं आव्हान
8
₹३६३४१२००००००० स्वाहा...! देशातील 7 कंपन्यांना मोठा फटका, रिलायन्सचं सर्वाधिक नुकसान 
9
‘आमच्यावर बॉम्ब फेकले तर अमेरिकेचे..., तणाव वाढत असताना इराणची थेट धमकी   
10
“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत
11
भाजपा बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव बेटी पढाव नाही तर…’, काँग्रेसची बोचरी टीका
12
PM Modi: भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
13
इलेक्ट्रिक वाहनांची 'सुसाट' धाव! २०२५ मध्ये २३ लाख ई-वाहनांची नोंदणी; कोणतं राज्य अव्वल?
14
IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी
15
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
16
इराणमध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीत अमेरिका? ट्रम्प यांच्या धमकीनंतर, इस्रायल 'हाय अलर्ट'वर
17
‘जैशकडे हजारो आत्मघाती हल्लेखोर…’, नव्या ऑडियोमधून मसूद अझहरची धमकी
18
कुत्र्याची भन्नाट हुशारी! तगड्या पिटबूलची 'अशी' केली फजिती; Video पाहून नेटकरीही थक्क
19
ट्रम्प यांच्या अमेरिकेत एक नवीन दहशत, गुलाबी कोकेन; सेवन केल्यावर शरीर निळे पडते
20
फॉर्म भरण्याचा त्रास संपला! UPI द्वारे PF काढता येणार; अवघ्या काही सेकंदात पैसे बँक खात्यात जमा
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 05:50 IST

बांधकाम व्यावसायिक दीपक मेहता यांच्यासह पाच जणांविरुद्ध  फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, हा तपास ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती कळवा पोलिसांनी रविवारी दिली. 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे :  कळवा परिसरातील राज्य सरकारच्या जमिनीवर एका बांधकाम व्यावसायिकाने ३६ वर्षांपूर्वी  तीन इमारती बांधून तेथील रहिवाशांची ४४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे, या इमारतींच्या पुनर्विकासासाठी डीम्ड कन्व्हेएन्स म्हणजेच जमीन नावावर करण्याची प्रक्रिया सुरू केली.  त्यावेळी हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक मेहता यांच्यासह पाच जणांविरुद्ध  फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, हा तपास ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती कळवा पोलिसांनी रविवारी दिली. 

कळव्यातील श्री अमृत पार्क सोसायटीतील रहिवासी अरविंद पटवर्धन (७४) यांनी याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला. बांधकाम व्यावसायिक दीपक मेहता यांच्यावर अरविंद पटवर्धन यांच्यासह ११२ सदनिकाधारकांची सुमारे ४४ कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. अमृत बिल्डर्स या भागीदारी संस्थेचे भागीदार दीपक मेहता, जयश्री मेहता, रमेश मेहता, केतन मेहता आणि प्रीती मेहता यांनी १९८९ मध्ये राज्य सरकारच्या चार हजार ३०० चौरस मीटर भूखंडावर तीन बेकायदा इमारती बांधून त्यातील सदनिकांची विक्री केली. अमृत पार्क, श्री अमृत पार्क आणि ओम अमृत पार्क अशी या तीन इमारतींची नावे आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणी करून सदनिकांची विक्री करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.  

असा उघड झाला घोटाळातिन्ही इमारती जुन्या झाल्याने त्यांच्या  पुनर्विकासाची तयारी रहिवाशांनी सुरू केली. त्यासाठी जमीन  नावावर करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. जमिनीची मोजणीही केली. त्यावेळी बिल्डरने दिलेल्या जागेच्या ऐवजी दुसऱ्याच जागेवर इमारत उभी केल्याचे उघड झाले. भूमापन विभागातील नोंदीनुसार, अमृत बिल्डर्सने सर्व्हे १२ ऐवजी १७ वर या इमारती उभ्या केल्या.  आता पुनर्विकासातही अडथळे निर्माण झाल्याने रहिवासी धास्तावले आहेत.

छत राहील की जाईल? अमृत बिल्डर्सच्या दीपक मेहता यांच्यासह पाच जणांविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात ४४ कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा २९ सप्टेंबर रोजी दाखल झाला. सदनिकाधारकांची दिशाभूल करीत दस्त नोंदणीकृत करून  फसवणुक करण्यात आल्याचे उघड झाले. त्यामुळे आपल्या डोक्यावर छत राहाणार का, याबद्दल रहिवाशांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Builder defrauds 112 residents by building on government land.

Web Summary : A builder in Kalwa cheated 112 residents of ₹44 crore by constructing buildings on government land 36 years ago. The fraud was discovered during redevelopment efforts, leading to a police investigation.
टॅग्स :fraudधोकेबाजीReal Estateबांधकाम उद्योग