शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2021: जिल्ह्यातील नद्यांच्या स्वच्छतेसाठी हवा निधी; जास्तीत जास्त लक्ष पर्यावरणाकडे देणे गरजेचं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 02:36 IST

यंदाच्या अर्थसंकल्पात पर्यावरणाच्या रक्षणासाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद केली पाहिजे

कोरोनामुळे फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर देणारा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे. या अर्थसंकल्पातून आपल्या वाट्याला काही ना काही यावे, अशी प्रत्येक क्षेत्राची अपेक्षा आहे. काय आहे या क्षेत्रांचे मागणे, यावर त्यात्या क्षेत्रातील मान्यवरांची भूमिका... 

उल्हासनगर ध्वनिप्रदूषणात अव्वल आहे. ‘हिराली’ मार्फत प्रदूषणाबाबत आवाज उठविला जात आहे. सरकारने वेळेत पर्यावरणाबाबत पाऊले उचलायला हवीत. अर्थसंकल्पात नुसता निधी राखून ठेवून चालणार नाही. यासाठी पर्यावरणाबाबत जागृती करणेही महत्त्वाचे आहे. - सरिता खानचंदानी,हिराली फाउंडेशन

 वालधुनी नदी देशातील सर्वाधिक प्रदूूषित नदींच्या यादीत आहे.   ठाणे जिल्ह्याला पिण्याचे पाणी देणाऱ्या उल्हास नदीची वाटचाल वालधुनीच्या दिशेने होत आहे. अर्थसंकल्पामध्ये उल्हास व वालधुनी नदीच्या स्वच्छतेसाठी निधी ठेवला पाहिजे.- शशिकांत दायमा, वालधुनी- उल्हास नदी बचाव संघटना

यंदाच्या अर्थसंकल्पात पर्यावरणाच्या रक्षणासाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद केली पाहिजे. आपल्या देशात प्रदूषणामुळे जल, जमीन, वायू हे सर्वच प्रदूषित होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने जास्तीत जास्त लक्ष पर्यावरणाकडे देणे गरजेचे आहे. अर्थसंकल्पात पर्यावरणाच्या बाबतीत विविध प्रकल्प हाती घेणे आवश्यक आहे. - विजय भोसले, पर्यावरणप्रेमी

संविधानामध्ये पर्यावरणाचे संरक्षण करण्याची जबाबदारीनिश्चित केलेली आहे. अनेक कायदे व न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून सोयीनुसार करून परवानग्या देणे बंद झाले पाहिजे. पर्यावरण संरक्षणासाठी बजेटमध्ये जास्तीची तरतूद करणे आवश्यक आहे.  - रूपाली श्रीवास्तव, पर्यावरणप्रेमी

केंद्रीय अर्थसंकल्पात पर्यावरणाच्या रक्षणासाठी कठोर उपाय व संवर्धनासाठी आर्थिक तरतूद केली गेली पाहिजे. केवळ पर्यावरण संरक्षणाचा बोलघेवडेपणा शासनाने करू नये. पर्यावरणाचे संरक्षण करून विकास व्हायला हवा. - कृष्णा गुप्ता, पर्यावरणप्रेमी, भाईंदर

टॅग्स :budget 2021बजेट 2021riverनदीenvironmentपर्यावरण