शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

ठाणे रेल्वे स्थानकात ब्रिटिशकालीन नॅरोगेज इंजीन, प्रवासी संघटनेचा पाठपुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 1:30 AM

Thane Railway Station : रेल्वेच्या इतिहासाच्या या स्मृती जपण्यासाठी ठाणे स्थानकात तेव्हाच्या काळातील वाफेचे इंजीन बसवण्याची मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने २०१२ पासून तत्कालीन खासदार, रेल्वे बोर्ड अध्यक्ष ते आताचे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे व्यक्त केली होती.

- अनिकेत घमंडी डोंबिवली : भारतात पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ ला ठाणे ते वाडीबंदर मार्गावर धावली. रेल्वेच्या इतिहासाच्या या स्मृती जपण्यासाठी ठाणे स्थानकात तेव्हाच्या काळातील वाफेचे इंजीन बसवण्याची मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने २०१२ पासून तत्कालीन खासदार, रेल्वे बोर्ड अध्यक्ष ते आताचे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे व्यक्त केली होती. अखेरीस गोयल यांनी ती मागणी मंजूर केली आहे. त्यानुसार ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक १ वर मुंबईच्या दिशेला बार्शी विभागांतर्गत धावलेल्या १८९७ मधील नॅरोगेजवरील इंजीन आणून बसवण्यात आले आहे. सव्वाशे  वर्षे जुने असलेले हे इंजीन दोन फूट लांब असून सहा इंच रुंद आहे. नॅरोगेज (छोट्या रुळांच्या) मार्गासाठी ते वापरात होते, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ब्रिटिश रेल्वेचे तत्कालीन अभियंता एडवर्ड रिचर्ड कॅलथरोप  यांनी त्या इंजिनाची निर्मिती केल्याची नोंद रेल्वेच्या इतिहासात आहे. बार्शी लाइट रेल्वे (बीएलआर)अंतर्गत महाराष्ट्रातील मिरज-लातूर या नॅरोगेज मार्गावर ३२५ किमी लांबपल्ल्याच्या मार्गावर हे इंजीन धावत असे. नॅरोगेजमुळे हा मार्ग खूप प्रसिद्ध होता. भारतीय रेल्वेचा इतिहास खूप थोर असून त्याबद्दल अनेक राष्ट्रांना अभिमान आहे. ब्रिटिशांमुळे देशभर रेल्वेचे जाळे विकसित झाले आहे. आता काश्मीर घाटी, अरुणाचल, नागालॅण्ड, मणिपूर आशा दुर्गम भागातही रेल्वेचे जाळे विस्तारले आहे. त्या अवाढव्य पसाऱ्यात नव्या पिढीला ठाणे स्थानकाचे महत्त्व माहिती व्हावे आणि प्रगल्भ इतिहासात ठाण्याची नोंद असावी याहून दुसरा तो आनंद काय असेल, असे सांगून प्रवासी महासंघाने त्याबद्दल खूप समाधान व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल, रेल्वे बोर्ड अध्यक्ष, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक, माजी खासदार आनंद परांजपे, खासदार राजन विचारे आदींचे आभार मानले.दरम्यान, ठाणे स्थानकात नॅरोगेज इंजिन दाखल झाल्याने १६ एप्रिलला भारतीय रेल्वेचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा मानस उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरवर्षी केक कापून वाढदिवस साजरा केला जातो. मात्र, यंदा इंजीन दाखल झाल्याने उत्साह वाढला आहे. ठाणे स्थानकाची ओळख भावी पिढीला होईल - केळकरठाणे स्थानकात वाफेवरील रेल्वे इंजीन बसविण्यासाठी गेली काही वर्षे पाठपुरावा करणाऱ्या आ. संजय केळकर यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. हा ऐतिहासिक ठेवा ठाणेकरांचाच असल्यामुळे ठाणे स्थानकाची वेगळी ओळख यानिमित्ताने भावी पिढीला होईल, असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला. ऐतिहासिक ठाणे स्थानकाची ओळख पटविणारे वाफेवरील पुरातन इंजीन ठाण्यात विराजमान व्हावे, अशी मागणी ठाणे रेल्वे प्रवासी संघाने केली होती. त्यामुळे केळकर यांनी विविध स्तरावर त्यासाठी पाठपुरावा केला. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेthaneठाणे