शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोलशेत पाईप लाईन रोडजवळील खाडी बुजविण्याचे काम

By अजित मांडके | Updated: June 24, 2024 16:57 IST

याठिकाणी राडरोड्याचा भराव टाकून कांदळवन नष्ट केले जात आहे. याठिकाणी सध्या याच कांदळवनावर गॅरेज, शाळा उभारल्या गेल्याचे भयावह चित्र दिसत आहे.

ठाणे : एकीकडे डेब्रीज हटविण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मोहीम हाती घेतली आहे. तसेच पथके देखील नेमली आहेत, परंतु असे असतांना कोलशेत पाईप लाईन रोडवर चक्क भराव टाकून खाडी बुजविण्याचे काम सध्या राजरोसपणे सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याठिकाणी राडरोड्याचा भराव टाकून कांदळवन नष्ट केले जात आहे. याठिकाणी सध्या याच कांदळवनावर गॅरेज, शाळा उभारल्या गेल्याचे भयावह चित्र दिसत आहे. तर पाईप लाईनच्या दुसºया बाजूला चक्क टर्फ उभारण्यात आला आहे. परंतु याची साधी भनक पालिका प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनाने नसल्याने आर्श्चय व्यक्त होत आहे.

ठाण्यातील विविध मोकळ्या ठिकाणांवर रात्री अपरात्री राडरोडा टाकला जात आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी काही दिवसांपूर्वी संबधीत विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेतली होती. त्यानंतर प्रभाग समितीनिहाय अशा ठिकाणांवर पथके नेमण्याचे निश्चित केले होते. त्यानंतर महापालिका अधिकाºयांच्या म्हणन्यानुसार तशी पथके नेमली गेली आहेत. मात्र कोलशेत भागात पाईप लाईन रोडवर कुठेही तशा प्रकारचे पथक आढळून आले नाही. याठिकाणी मागील काही महिन्यापासून खाडी किनाºयावर कांदळवनात राडरोड्याच्या माध्यमातून भराव टाकला जात असल्याचे दिसून आले आहे. या रस्त्याच्या सुरवातीलाच एक गॅरेज उभारले गेले आहे. पुढे एक शाळा देखील सुरु असल्याचे दिसून आले आहे. त्याही पुढे गेल्यानंतर आणखी एक गॅरेज राजरोसपणे सुरु असल्याचे दिसून आले आहे. त्यात आणखी पुढील बाजूस खाडीतच भराव टाकण्यात येऊन येथील प्रवाह बदलण्याचे काम केले जात असल्याचे दिसत आहे. येथे कांदळ वनाची देखील कत्तल झाल्याचे दिसत आहे. येथील जवळ जवळ एक एकरहून अधिकचा परिसरावर राडरोडा टाकून तेथील परिसर सपाट करण्यात आला आहे. परंतु महापालिकेचे अद्यापही याकडे लक्ष गेले नसल्याने आर्श्चय व्यक्त केले जात आहे.

पाईप लाईनच्या दुसऱ्या बाजूला अनाधिकृत बांधकामे उभी राहत असून याठिकाणी एक भला मोठा टर्फ देखील उभारला गेला असून त्याठिकाणी रात्रीच्या अंधारात क्रिकेट आणि फुटबॉलचे सराव सुरु असल्याची माहिती येथील स्थानिकांनी दिली. परंतु हे सर्व कोणाच्या आर्शिवादाने आणि कृपेने सुरु आहे. याचे उत्तर महापालिकेकडे नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता महापालिका आयुक्त सौरभ राव यावर काय भुमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या संदर्भात सहाय्यक आयुक्तांशी चर्चा करुन परिस्थिती तपासून पुढील कारवाई प्रस्थापित केली जाईल, असं ठाणे महापालिकेचे अतिक्रमण विभाग उपायुक्त गजानन गोदेपुरे म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका