शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

बुलेट ट्रेनच्या मार्गात जमीन संपादनाचा ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:47 IST

डेडलाइन एक वर्ष लांबणीवर पडणार : अवघ्या ०.९ हेक्टरच जमिनीचे संपादन

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात महाराष्ट्रासह गुजरातमध्ये जमीन संपादनास शेतकऱ्यांकडून विरोध होऊ लागला आहे. यामुळे आॅगस्ट २०२२पर्यंत ती सुरू करणे अशक्य असल्याचे ती विकसित करणाºया जपानने कळविले आहे. यामुळे बुलेट ट्रेनसाठी स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने आता गुजरातसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी शेतकºयांच्या बैठका घेऊन त्यांना विश्वासात घेऊनच जमीन संपादन करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार ठाणे जिल्ह्यातील शेतकºयांची बैठक २९ मे रोजी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये आयोजिली आहे. जमीनच संपादित झाली नसल्याने बुलेट ट्रेन सुरू होण्याची डेडलाइन डिसेंबर २०२३पर्यंत पुढे सरकू शकते, असेही जपान सरकारने नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनला कळविले आहे.राज्यातील एक इंचही जमीन संपादित नाहीआतापर्यंत बुलेट ट्रेन जेथून सुरू होणार आहे, त्या मुंबईतील वांद्रा-कुर्ला संकुलातील ०.९ हेक्टर जमीन वगळता राज्यातील एक इंचही जमीन अद्याप संपादित करण्यात आलेली नाही. शेतकºयांसह शिवसेना-मनसेसारख्या राजकीय पक्षांच्या तीव्र विरोधामुळे महाराष्ट्रात नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच पालघरची पोटनिवडणूक लागल्यामुळे त्या भागात तूर्तास रेल्वे मंत्रालयाने भाजपा उमेदवारासाठीच्या मतांच्या बेगमीकरिता बुलेट ट्रेनसाठी जमीन संपादन थांबविले आहे. राज्यात काही ठिकाणी सर्व्हे आणि मोजणी झालेली आहे. मात्र, संपादन झालेले नाही.महाराष्ट्रासह गुजरातच्या शेतकºयांकडून विरोधबुलेट ट्रेनमुळे गुजरातची १९२ तर महाराष्ट्रातील १२० गावे बाधित होणार आहेत. ५०८ किमीच्या या माार्गापैकी ४८७ किमी उन्नत तर२२ किमी भूमिगत मार्ग आहे. मात्र, त्यासाठी दोन्ही राज्यांतील जी जमीन जाणार आहे, त्यातील बहुतेक जमीन सुपीक आहे. यामुळे शेतकºयांनी बाजारभावापेक्षा जास्त दर मागितला आहे. तो देण्यास सरकार तयार नसल्याने शेतकºयांचा विरोध दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.गुजरातमध्ये येत्या डिसेंबर अखेरपर्यंत संपूर्ण जमीन संपादित करण्याचा नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनचा मानस आहे.मात्र, आता शेतकºयांच्या मागणीमुळे त्यात अडथळा निर्माण झाला आहे.गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात सरकार दरएकरी रेडीरेकननुसान सहा ते सात लाख रुपये देऊ पाहत आहे. मात्र, बाजारभाव ५० ते ६० लाख रुपये असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.दिवा भागात तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी जमिनीच्या सर्व्हेस विरोध करून मोजणीच्या मशीनही फेकून दिल्या होत्या. यानंतर दीडशे कार्यकर्त्यांपैकी पोलिसांनी अवघ्या आठ कार्यकर्त्यांना अटक केली होती. सध्या त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. राष्ट्रवादीनेही आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली विरोध दर्शविला आहे.राष्ट्रीय महामार्गालगतच्या जमिनीसाठी हाच दर एक कोटीच्या घरात आहे. तर सुरतसारख्या शहरी भागात तो ३ ते ४ कोटींच्या घरात आहे. दक्षिण गुजरातमध्ये आंबा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या भागातील अनेक शेतकरी भाजपा समर्थक असले तरी त्यांनी योग्य मोबदल्याशिवाय एक इंचही जमीन देण्यास विरोध दर्शविला आहे. असाच प्रकार ठाणे शहरालगतच्या दिवा भागात असून, शेतकºयांनी बाजारभावापेक्षा जास्त रक्कम मागितली आहे. यामुळे जमीन संपादनाअभावी या हायस्पीड बुलेट ट्रेनच्या कामास बे्रक लागला आहे.या प्रकल्पाकरिता एकूण १४०० हेक्टर जमीन लागणार असून नॅशनल हायस्पीड कॉर्पोरेशनने त्यासाठी१० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.सीआरझेडसह पर्यावरण विभागाच्या परवानग्या हव्यातजमीन संपादनानंतर सीआरझेडसह वन आणि पर्यावरण खात्याच्या अनेक परवानग्यांचा अडथळा पार करावा आहे. कारण बुलेट ट्रेनसाठी जी जमीन लागणार आहे, त्यात ८३.५५ हेक्टर वनजमिनीचा समावेश असून यात महाराष्ट्रातील ७७.४५ तर गुजरातमधील ६.१० हेक्टर वनजमिनीचा समावेश आहे. याशिवाय ठाणे खाडीतील तिवरांचे शेकडो हेक्टर जंगल तोडावे लागणार आहे. तसेच तुंगारेश्वरसह अनेक वनांतून ही ट्रेन जाणार असून या संपूर्ण मार्गात४० ते ४५ हजार वृक्षांवर कुºहाड कोसळणार आहे. यासाठीच्या केंद्रीय वने आणि पर्यावरण खात्याच्या सर्व परवानग्यांसह न्यायालयीन लढाया पार केल्यानंतरच बुलेट ट्रेनच्या कामास खºया अर्थाने ‘स्पीड’ मिळणार आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन