उल्हासनगरमध्ये 'शाखा वॉर' सुरू; कार्यालयावरील बॅनर्स फाडणाऱ्या गुन्हा दाखल करण्याची ठाकरे गटाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 17:15 IST2025-09-02T17:15:03+5:302025-09-02T17:15:31+5:30
उल्हासनगर : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पडस्पर्शाने पावन झालेले व त्यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या मध्यवर्ती शाखा कार्यालयावर शिंदेसेनेच्या ...

उल्हासनगरमध्ये 'शाखा वॉर' सुरू; कार्यालयावरील बॅनर्स फाडणाऱ्या गुन्हा दाखल करण्याची ठाकरे गटाची मागणी
उल्हासनगर :शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पडस्पर्शाने पावन झालेले व त्यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या मध्यवर्ती शाखा कार्यालयावर शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेवक शेखर यादव यांच्या पक्ष प्रवेशानंतर ताब्यात घेतली. तसेच कार्यालयावरील ठाकरेसेनेचे बॅनर्स फाडले होते. त्याला आक्षेप घेत ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालय ताब्यात घेऊन बॅनर्स फाडणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्याकडे केली.
उल्हासनगर मराठा सेकशन विभाग शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. याच परिसरातील पक्षाच्या मध्यवर्ती शाखा कार्यालयाचे उदघाटन शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उदघाट्न झाले होते. पक्ष फुटीनंतर शाखा कार्यालय ठाकरेसेनेच्या ताब्यात असून पक्षाचा कारभार याच शाखेतून सुरू होता. दरम्यान स्थानिक माजी नगरसेवक शेखर यादव, संगीता सपकाळे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात दोन दिवसापूर्वी शिंदेसेनेत प्रवेश घेतला. त्यानंतर शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री मराठा मध्यवर्ती शिवसेना शाखा कार्यालयाचा ताबा घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवानेते आदित्य ठाकरे यांचे फोटो उतरविले. तसेच शाखा कार्यालयावरील ठाकरेसेनेचे बॅनर्स काहीजणांनी फाडून टाकण्यात आले.
ठाकरेसेनेचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू, शहरप्रमुख कैलास तेजी, नेते राधाचरण करोतिया, शिवाजी जावळे, राजेंद्र वेलकर, उपशहरप्रमुख दिलीप मिश्रा, महिला पदाधिकारी व शिवसैनिकानी सोमवारी मराठा सेकशन येथील मध्यवर्ती शाखा कार्यालय गाठून झालेल्या प्रकाराचा निषेध केला. तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली मध्यवर्ती शाखा कार्यालय पक्षाचे स्थानिक शिवसेना भवन असल्याची प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी दिली. दोन दिवसापूर्वी शाखा कार्यालय ताब्यात घेण्याच्या प्रकाराचा व बॅनर्स फाडल्याचा निषेध करून पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची भेट घेऊन सर्व प्रकार कथन केला. तसेच बॅनर्स फाडणाऱ्या व पक्षांप्रमुखांचे फोटो उतरणाऱ्या कारवाई करण्याची मागणी केली.
शिंदेसेना व ठाकरेसेना आमने-सामने
मराठा सेकशन येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखा कार्यालया वरून शिंदेसेना व ठाकरेसेना आमने सामने येण्याची शक्यता निर्माण झाली. ठाकरे सेनेचे पदाधिकारी पूर्वीप्रमाणेच मध्यवर्ती कार्यालयात बसून नागरिकांच्या समस्या सोडविणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी दिली.