भिवंडीत हॉटेलच्या बाहेर मुलीवर गोळीबार करून मुलगा पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 18:22 IST2018-01-10T18:18:17+5:302018-01-10T18:22:06+5:30
भिवंडी-कल्याण मार्गावरील रांजनोली गावाच्या हद्दीत असलेल्या के. एन. पार्क हॉटेलमध्ये आज दुपारी ३.३० ते ४ वाजताच्या सुमारास एका मुलीवर गोळीबार करून एक मुलगा फरार झाला आहे.

भिवंडीत हॉटेलच्या बाहेर मुलीवर गोळीबार करून मुलगा पसार
ठाणे- भिवंडी-कल्याण मार्गावरील रांजनोली गावाच्या हद्दीत असलेल्या के. एन. पार्क हॉटेलमध्ये आज दुपारी ३.३० ते ४ वाजताच्या सुमारास एका मुलीवर गोळीबार करून एक मुलगा फरार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मनोज पाटील आणि अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. गोळीबारात जखमी झालेली मुलगी शहापूर येथील राहणारी असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. घटनास्थळी पोलीस पंचनामा सुरू असून, फरार झालेल्या आरोपीचा पोलीस कसोशीने शोध घेत आहेत.