अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 18:36 IST2018-07-17T18:36:14+5:302018-07-17T18:36:17+5:30
शारिरीक भुक भागवण्यासाठी बांधकाम मजूरांनी ७ वर्षीच्या मुलावर लैगिंक अत्याचार करुन त्याची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात झाला आहे.

अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक
डोंबिवली : शारिरीक भुक भागवण्यासाठी बांधकाम मजूरांनी ७ वर्षीच्या मुलावर लैगिंक अत्याचार करुन त्याची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात झाला आहे.
डोंबिवलीमध्ये २४ मे ला ७ वर्षांच्या मुलावर लैगिंक अत्याचार करुन त्याची हत्या करण्यात आली होती. आणि त्याचा मृतदेह त्याच्याच घराजवळील अर्धवट बांधकाम झालेल्या संडासच्या टाकीत टाकण्यात आला होता... याप्रकरणी डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी एहसान आलम (२२) आणि नदीम आलम (२१) या दोघांना जणांना अटक केली आहे.
मोबाईलमधील पाॅर्न क्लीप पाहून हा प्रकार केल्याची कबूली आरोपींनी दिली असून फिल्मी स्टाईल पद्धतीने या नराधमांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार करुन त्याची हत्या केली. शेवटी आज २ महिन्यांनतर मानपाडा पोलिसांना मारेक-यांना अटक करण्यात यश आल आहे.
हत्या करण्या ६ तास आधीच त्याला गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते... हे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले होते...