मुलाच्या हत्येप्रकरणी दोघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 02:41 IST2018-07-19T02:41:42+5:302018-07-19T02:41:57+5:30
मोबाइलमधील अश्लिल चित्रपट पाहून एका सात वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या केल्याप्रकरणी एहसान आलम (२२) आणि नदीम आलम (२१) या दोघांना खबऱ्यांच्या मदतीने मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

मुलाच्या हत्येप्रकरणी दोघे अटकेत
डोंबिवली : मोबाइलमधील अश्लिल चित्रपट पाहून एका सात वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या केल्याप्रकरणी एहसान आलम (२२) आणि नदीम आलम (२१) या दोघांना खबऱ्यांच्या मदतीने मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पूर्वेतील देसले पाडा परिसरातील चाळीत राहणारा हा मुलगा २४ मे रोजी खेळताना बेपत्ता झाला होता. दुसºया दिवशी सकाळी घराजवळील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या डेÑनेजच्या टाकीत त्याचा मृतदेह आढळला होता. बांधकाम विकासकाच्या हलगर्जीमुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. परंतु, डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीत मृत्यू संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले होते.
ंमागील दीड वर्षापासून आरोपी बांधकाम मजूर म्हणून काम करत होते. त्यामुळे मुलाची आणि त्यांची ओळख झाली होती. त्याचा फायदा घेत घटनेच्या दिवशी चॉकलेट देण्याचा बहाणा करत त्यांनी मुलाला इमारतीत नेऊन त्याच्यावर अत्याचार केला होता. एहसान याने त्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला होता. तर नदीमने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली होती.