भिवंडीत डाईंग कारखान्यात बॉयलरचा स्फोट; दोन कामगार जखमी 

By नितीन पंडित | Updated: February 24, 2024 11:22 IST2024-02-24T11:21:25+5:302024-02-24T11:22:42+5:30

या बॉयलर स्फोटाचा व्हिडिओ शनिवारी सकाळपासून समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Boiler explosion at dyeing factory in Bhiwandi; Two workers injured | भिवंडीत डाईंग कारखान्यात बॉयलरचा स्फोट; दोन कामगार जखमी 

भिवंडीत डाईंग कारखान्यात बॉयलरचा स्फोट; दोन कामगार जखमी 

भिवंडी: शहरातील नारपोली परिसरात असलेल्या सोलंकी प्रोसेस मिल या कपड्यावर रंगकाम करणाऱ्या डाईंग कारखान्यात रात्री उशिरा बॉयलरचा स्फोट होण्याची घटना घडली.

या दुर्घटनेत दोन कामगार जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होत त्यांनी अवघ्या एक तासात बॉयलर स्फोटा मुळे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले.आगीचे कारण अजून स्पष्ट नसून भोईवाडा पोलिस या घटनेची चौकशी करीत आहेत. या बॉयलर स्फोटाचा व्हिडिओ शनिवारी सकाळपासून समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Web Title: Boiler explosion at dyeing factory in Bhiwandi; Two workers injured