प्लास्टिकच्या ड्रममध्ये सापडला महिलेचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 00:58 IST2019-04-15T00:58:23+5:302019-04-15T00:58:29+5:30
भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावातून जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या पाइपलाइन रोडवर २५ ते ३० वर्षांच्या अनोळखी महिलेचा मृतदेह शनिवारी एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये आढळला.

प्लास्टिकच्या ड्रममध्ये सापडला महिलेचा मृतदेह
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावातून जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या पाइपलाइन रोडवर २५ ते ३० वर्षांच्या अनोळखी महिलेचा मृतदेह शनिवारी एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये आढळला. तीक्ष्ण हत्याराने हत्या करून तिचे अवयव छाटलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महिलेची ओळख पटू नये, यासाठी मारेकऱ्यांनी तिचे मुंडके धडावेगळे, तर दोन्ही पाय गुडघ्यापासून आणि उजवा हात काखेतूनच छाटला आहे. तिचा निर्वस्त्र मृतदेह एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरून तो ड्रम तालुक्यातील सोनाळे गावच्या हद्दीत येणाºया मुंबई महापालिकेच्या पाइपलाइन रोडवर एका सह्याद्री रेडिमिक्स प्लान्टसमोर फेकून दिला होता. या अमानुष हत्याकांडाची माहिती पोलीस पाटील शत्रुघ्न पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्याला दिली. या घटनेची दखल घेत तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे हे तत्काळ पोलीस पथकासह घटनास्थळी गेले. घटनास्थळाचा पंचनामा करून, मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या निर्घृण हत्येप्रकरणी अज्ञात मारेकºयांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हजारे करत आहेत.