शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! आईसह तीन मुलांच्या मृतदेहाचे सांगाडे झाडाला आढळल्याने उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 10:12 IST

भिवंडीत सडलेल्या अवस्थेत सापडले चौघांचे मृतदेह; वडिलांचाही आत्महत्येचा प्रयत्न

नितिन पंडीत- 

भिवंडी ( दि. ११ ) - दोन महिन्यापासून बेपत्ता असलेल्या आईसह तीन मुलांचे मृतदेह झाडाला सडलेल्या अवस्थेत लटकलेले आढळून आल्याची घटना भिवंडीतील पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उबंरखांड पाच्छापूर जंगलात घडली आहे. दोन महिन्या नंतर गुरुवारी हि घटना समोर आल्याने या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पत्नी आणि तिन्ही मुलांचे मृतदेह पाहून वडिलांनी देखील विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर मुंबईच्या जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेेत. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच पाडघ्याच्या पुढे असलेल्या शहापूर तालुक्यातील खर्डी नजीकच्या जंगलात अशाच प्रकारे तिघांचे मृतदेह आढळून आले होते. मात्र पोलीस तपासाअंती या तिघांनी तंत्रमंत्र विद्या शिकण्यासाठी व अमर होण्यासाठी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. आता अश्याच प्रकारे झाडाला सडलेल्या व लटकलेल्या अवस्थेत हे चारही माय - लेकांचे मृतदेह आढळून आल्याने याप्रकरणी पडघा पोलीस सखोल तपास करीत आहत.             

श्रीपत बच्चू बांगारे असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमाचे नाव आहे. तर त्याची मयत पत्नी रंजना (वय ३०) , मयत मुलगी दर्शना (वय, १२), रोहिणी (वय ६) आणि मुलगा रोहित (वय ९) असे झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलेल्या चौघांची नावे आहेत. मात्र संशयास्पद आणि भयंकर अश्या घटनेच्या तपासाचे पडघा पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. भिवंडी तालुक्यातील उंबरखांड गावातील श्रीपत यांनी २१ ऑक्टोंबरला चौघेही माय - लेक बेपत्ता झाल्याची तक्रार पडघा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र गुरुवारी दुपारच्या सुमारास श्रीपतचा भाऊ जंगलात लाकडे आणण्यासाठी गेला असता, त्याला एका झाडावरून दुर्गन्धी येत होती. त्यामुळे त्याने पहिले असता झाडाला सडलेल्या अवस्थेत चारही मृतदेह आढळून आले. या मृतदेहाच्या अंगावरील कपड्या मूळे त्यांची ओळख पटल्याने घटनेची माहिती भावाने श्रीपतला दिली. त्यांनतर पत्नी आणि ३ मुलांच्या मृत्यूंची बातमी  मिळताच श्रीपतने स्वतः देखील विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्याच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच ठाणे ग्रामीण विभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह पडघा  पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून फॉंरेन्सिक पथकही घटनास्थळी आले होते. मात्र दोन महिन्यापासून चौघांचे मृतदेहाचे सांगाडे झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पडघा पोलीस सखोल तपास करीत आहेत. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSuicideआत्महत्या