पोलीस आयुक्तांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:45 IST2021-08-17T04:45:23+5:302021-08-17T04:45:23+5:30

मीरा रोड - देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयांचे आयुक्त सदानंद दाते यांच्यासह पोलीस ...

Blood donation was made by the officers and employees including the Commissioner of Police | पोलीस आयुक्तांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

पोलीस आयुक्तांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

मीरा रोड - देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयांचे आयुक्त सदानंद दाते यांच्यासह पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

रविवारी स्वातंत्र्यदिनी मीरा रोड येथील महापालिकेच्या अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात पोलीस आयुक्तालयाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. पालिकेच्या राजीव गांधी रक्तपेढीच्या साह्याने आयोजित या रक्तदान शिबिरात ११० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून स्वातंत्र्य दिन साजरा केला. पोलीस आयुक्त सदानंद दाते, अप्पर पोलीस आयुक्त एस. जयकुमार, पोलीस उपायुक्त महेश पाटील आदी अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. पोलीस आयुक्तांनी परराज्यांतून आलेल्या व शिक्षणासाठी पोलीस आयुक्तालय हद्दीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीस आयुक्तालयात ध्वजारोहणासाठी निमंत्रित केले होते. आयुक्तांनी त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांची आस्थेने विचारपूस केली.

Web Title: Blood donation was made by the officers and employees including the Commissioner of Police