शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पोटनिवडणुकीत भाजपचे जग्यासी बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 10:49 PM

उल्हासनगर : पूजा बनिया, अंबादास पालवे यांची माघार, एका प्रभागात तिरंगी लढत

उल्हासनगर : महापालिका प्रभाग क्र. १ आणि ५ मध्ये २३ जून रोजी पोटनिवडणूक होत आहे. त्यापैकी प्रभाग क्र. ५ मध्ये अंबादास पालवे व पूजा बनिया यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने, भाजपचे राजू जग्यासी बिनविरोध निवडून आले. प्रभाग क्र .१ मध्ये अपक्ष उमेदवार रामा शेले व एकनाथ आढारे यांनी अर्ज मागे घेतले असून वनीता भोईर, मंगळ वाघे व नितीन मेश्राम यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.उल्हासनगर महापालिका प्रभाग क्र. १ व ५ च्या पोटनिवडणुकीत प्रत्येकी सहा उमेदवार रिंगणात होते. अर्ज छाननीत प्रभाग क्र. ५ चे रिपाइं पुरस्कृत अपक्ष उमेदवार दिलीप जग्यासी, माजी नगरसेवक अपक्ष उमेदवार पृथ्वी वलेच्छा, राहुल अंबावणे यांचे अर्ज बाद झाल्याने भाजपचे राजू जग्यासी, अपक्ष उमेदवार अंबादास पालवे व पूजा बनिया असे तीन जण निवडणूक रिंगणात राहिले होते. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष व माजी आमदार कुमार आयलानी यांच्या राजकीय खेळीमुळे अपक्ष उमेदवार पूजा बनिया व अंबादास पालवे यांनी सोमवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे राजू जग्यासी एकमेव रिंगणात राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

महापालिका प्रभाग क्र. १ मध्ये भाजपच्या वनीता भोईर यांच्यासह काँग्रेसचे नितीन मेश्राम, रिपाइं आठवले गटाच्या मंगळ वाघे, रामा शेले व अपक्ष उमेदवार एकनाथ आढारे असे पाच जण रिंगणात होते. त्यापैकी रामा शेले व एकनाथ आढारे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपच्या वनीता भोईर, काँगे्रसचे नितीन मेश्राम व रिपाइंच्या मंगळ वाघे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. भाजप नगरसेविका पूजा भोईर व सोनू छापरू यांचे जातप्रमाणपत्र जातपडताळणी समितीने अवैध ठरवत नगरसेवकपद रद्द केल्याने या पोटनिवडणुका होत आहे. प्रभाग क्र. १ मध्ये भाजप, शिवसेना, साई, ओमी टीमविरुद्ध रिपाइं व काँग्रेस अशी लढत होणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेNavi Mumbaiनवी मुंबईulhasnagarउल्हासनगरBJPभाजपा