शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

दौलत दरोडांना भाजपचे पाठबळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:45 AM

अपक्ष म्हणून रिंगणात ? : शहापूर मतदारसंघावर दावा करणारा केला ठराव

शहापूर : शहापूर विधानसभा मतदारसंघात गेली २५ वर्षे युतीचा धर्म पाळून भाजप शिवसेनेला मदत करीत आला आहे. मात्र अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची वाढलेली ताकद पाहता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेने भाजपला सोडावा, असा ठराव स्थानिक भाजप कार्यकारिणीने मंजूर केला असल्याने शिवसेनेच्या निर्णयावर नाराज असलेल्या दौलत दरोडा यांना आपल्याकडे खेचून भाजप रिंगणात उतरवण्याची दाट शक्यता आहे. विधानसभेला भाजप-शिवसेनेची युती झाली तर दरोडा यांना अपक्ष रिंगणात उतरवून भाजप पडद्याआडून मदत करील. यदाकदाचित जागावाटपावरून युती फिसकटली तर दरोडा हे भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पांडुरंग बरोरा हे पक्षांतराच्या पवित्र्यात असल्याची कुणकुण लागताच भारतीय जनता पार्टीच्या शहापूर तालुका कार्यकारिणीची बैठक भाजपा तालुकाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शहापूर येथे अलीकडेच भाजप कार्यालयात झाली होती. त्यावेळी शहापूर विधानसभा मतदारसंघ भाजपला द्यावा, असा ठराव भाजपचे ठाणे विभाग सरचिटणीस काशिनाथ भाकरे यांनी मांडला. त्यास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दिनकर यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे बरोरा यांच्या शिवसेना प्रवेशामुळे अस्वस्थ असलेले दरोडा व त्यांच्या समर्थकांकरिता भाजपचे दार अगोदरच किलकिले झाल्याची चर्चा आहे. याबाबत गुरुवारी दरोडा यांना विचारले असता ते म्हणाले की, मी अखेरपर्यंत शिवसेनेकडून शहापूर विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. एकनाथ शिंदे हे माझ्यावर अन्याय होऊ देणार नाहीत, असा विश्वास दरोडा यांनी व्यक्त केला. भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी देऊ केली तर काय करणार, असा थेट सवाल केला असता दरोडा यांनी या प्रश्नाचे उत्तर असा प्रस्ताव समोर आल्यावरच देऊ, असे सूचक वक्तव्य केले.स्थानिक वादांकडे पवारांचे दुर्लक्षच्आमदार पांडुरंग बरोरा यांचे शरद पवार, अजित पवार तसेच राज्यातील वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. मात्र त्यांचे स्थानिक नेत्यांबरोबर व विशेष करून ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस(ग्रामीण)चे अध्यक्ष दशरथ तिवरे यांच्यासोबतचे मतभेद विकोपाला गेले होते.च्अर्थात राज्यातील प्रमुख नेत्यांनी हे वाद मिटवण्याकरिता फारसे काही केले नाही. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सभेला प्रतिसाद न मिळाल्याने संतापलेल्या प्रमोद हिंदुराव यांनी खुर्च्या खाली करण्याचे केलेले विधान हेही बरोरा व राष्ट्रवादीत दुरावा निर्माण करणारे ठरले.च्ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली होती. त्याचा फटका राष्ट्रवादीला बसला होता. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा लागलेला विपरित निकाल ही धोक्याची घंटा असल्याचे ध्यानात घेऊन बरोरा यांनी भाजप किंवा शिवसेनेमध्ये जाण्याचा विचार पक्का केला.

‘दबावतंत्राचे राजकारणकेल्यास गंभीर परिणाम’वासिंद : शिवसेनेत पक्षनिष्ठेला महत्त्व आहे. सेनेत आदेश पाळला जातो. सेनेत जो आदेश पाळणार नाही व पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन गटबाजी किंवा दबावतंत्राचे राजकारण करील, त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा शिवसेनेचे शहापूर तालुकाप्रमुख मारु ती धिर्डे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला. राष्ट्रवादीचे आ. बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धिर्डे बोलत होते. बरोरा यांच्या सेनेतील प्रवेशामुळे माजी आ. दरोडा नाराज असून तालुक्यातील दरोडा समर्थक हे सामूहिक राजीनामे देण्याच्या पवित्र्यात असल्याबाबत विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले.पेसा कायद्यांतर्गत शहापूर तालुक्यातील नोकरभरतीत १०० टक्के आदिवासींसाठी राखीव झाल्याने बिगर आदिवासी समाजामध्ये असंतोष पसरला होता. बरोरा हे आदिवासी समाजातील असल्याने त्यांना बिगर आदिवासींच्या असंतोषाचा सामना करावा लागेल, अशी व्यूहरचना राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी करून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेही पक्षांतराची त्यांची मानसिकता पक्की झाली.शहापूरच्या विकासासाठी शिवसेनेत प्रवेश - बरोरापांडुरंग बरोरा म्हणाले की, शहापूर तालुक्यातील जनतेचे प्रश्न विशेषत: तालुक्यातील पाणीटंचाई कायमची सोडवण्यासाठी भावली पाणीयोजना शहापुरात राबवण्याकरिता, जनतेसाठी विकासकामांचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. सत्तेशिवाय शहाणपण नाही आणि माझ्या तालुक्याचे प्रश्न शिवसेनाच सोडवू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.युती झाल्याने भाजप प्रवेश हुकलाभावली पाणीयोजनेसाठी बरोरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनेकदा भेट घेतली. त्यामुळे फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली. बरोरा हे भाजपशी संधान बांधून होते. मात्र लोकसभेला भाजप-शिवसेनेची युती झाल्याने व विधानसभा निवडणुकीत ही युती तुटण्याची शक्यता कमी असल्याने आणि शिवसेना शहापूरवरील दावा सोडण्याची अजिबात शक्यता नसल्याने अखेर बरोरा यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :thaneठाणे