उल्हासनगरात भाजपाचे निषेध आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 18:00 IST2021-03-21T18:00:03+5:302021-03-21T18:00:15+5:30
उल्हासनगर : मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर खुलासा मुळे राज्यात खळबळ उडाली असून शहर भाजपने कॅम्प नं-३ ...

उल्हासनगरात भाजपाचे निषेध आंदोलन
उल्हासनगर : मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर खुलासा मुळे राज्यात खळबळ उडाली असून शहर भाजपने कॅम्प नं-३ परिसरात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची मागणी करीत आंदोलन करण्यात आली.
भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, विरोधीपक्षनेते किशोर वनवारी, पक्ष प्रवक्ता मनोज लासी यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी यांनी दुपारी कॅम्प नं-३ अमन टॉकीज रस्त्यावर एकत्र येत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर खुलासामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या आंदोलनामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.