शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा मोठा निर्णय; डॅमेज कंट्रोल सुरू
2
आजचे राशीभविष्य, १८ जून २०२४ : कर्कसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
महायुतीत तिसरा मित्र नको म्हणणाऱ्यांना भाजपमध्ये बळ; आकडेवारीने वाढवली अजित पवारांची डोकेदुखी!
4
लोकसभा अध्यक्षपद भाजपकडेच?; 'या' महिला नेत्याचे नाव स्पर्धेत आघाडीवर
5
...तर मी ओबीसींच्या आंदोलनात पुन्हा उतरेन; मंत्री छगन भुजबळांचा सरकारला इशारा
6
आजचा अग्रलेख: संशयकल्लोळ..!
7
गणपती स्पेशल जादा गाड्या सोडा; अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी
8
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
9
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
10
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
11
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
12
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
13
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
14
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
15
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
16
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

उल्हासनगर स्थायी समिती सभापतीपदी भाजपाच्या माखिजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 6:47 AM

महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपाच्या जया माखिजा यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तसेच प्रभाग क्रमांक ३ व ४ च्या सभापती पदासाठी अनुक्रमे साई पक्षाच्या ज्योती चैनानी व शिवसेनेच्या ज्योती माने यांचा

उल्हासनगर - महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपाच्या जया माखिजा यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तसेच प्रभाग क्रमांक ३ व ४ च्या सभापती पदासाठी अनुक्रमे साई पक्षाच्या ज्योती चैनानी व शिवसेनेच्या ज्योती माने यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांचीही सभापतीपदासाठी निवड झाली. मात्र प्रभाग क्रमांक १ व २ च्या सभापतीपदासाठी भाजपा विरूध्द ओमी टीम असा सामना रंगणार आहे. ही निवडणूक ११ एप्रिलला होणार आहे.स्थायीसह प्रभाग समिती सभापतीपदासाठी बुधवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. स्थायी समितीत एकूण १८ सदस्यांपैकी भाजपा-ओमी टिमचे-७, साई-३, शिवसेना-५ व राष्ट्रवादी-१ असे बलाबल आहे. भाजपाच्या माखिजा यांचा सभापतीपदासाठी एकमेव अर्ज आल्याने विरोधी पक्षातील शिवसेनेने स्थायी समिती सभापती पदासाठी अर्ज दाखल केला नाही. माखिजा यांच्या अर्जावर ओमी टीमचे पंचम कलानी व राजेश वधारिया यांचे अनुमोदन असून एकमेव अर्ज आल्याने त्यांची सभापतीपदाची निवड निश्चित आहे. भाजपा-ओमी टीमच्या करारानुसार स्थायी समिती सभापतीपद ओमी टीमकडे गेले होते. मात्र ऐनवेळी माखिजा यांचे नाव भाजपाने पुढे केले असून ओमी टीमनेही अखेर पाठींबा दिला.प्रभाग समिती क्रमांक -१ च्या सभापतीपदी भाजपाचे सोनू छापू तर ओमी टीमकडून हरेश जग्यासी यांचा अर्ज आला.तसेच प्रभाग- २ च्या सभापतीपदासाठी ओमी टीमकडून शुभांगिनी निकम, भाजपाकडून लक्ष्मी सिंग, रिपाइंचे भगवान भालेराव, साई पक्षाचे पप्पू गुप्ता असे ४ अर्ज दाखल झाले. भाजपा व ओमी टीमपैकी कुणाचे उमेदवार अर्ज मागे घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रभाग समिती १ व २ मध्ये भाजपा व ओमी टीमच्या नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने, त्यांच्यात सभापतीपदावरून जुंपली आहे.सत्ताधारी व विरोधकांत एकमत?सत्ताधारी पक्षातील भाजपा-ओमी टीम, साई तर विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना यांच्यात चर्चा होऊन एकमेकांविरोधात उमेदवार न देण्याचे ठरले अशी माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. त्यामुळेच स्थायी समिती सभापतीपदासह प्रभाग ३ व ४ सभापतीपदाची बिनविरोध निवड झाली. प्रभाग १ व २ मध्येही शिवसेनेने उमेदवार दिलेला नाही. भाजपा व ओमी टीमचे उमेदवार सभापतीपदासाठी एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने त्यांच्यातील वाद पुन्हा चव्हाटयावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे