भिवंडी पंचायत समिती सभापती पदी भाजपचे महेंद्र पाटील, बिनविरोध झाली निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 19:56 IST2021-12-21T19:55:02+5:302021-12-21T19:56:04+5:30
पाटील यांची निवड जाहीर होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समिती परिसरात एकच जल्लोष केला.

भिवंडी पंचायत समिती सभापती पदी भाजपचे महेंद्र पाटील, बिनविरोध झाली निवड
भिवंडी- भिवंडीपंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे महेंद्र पाटील यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली. केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्या पुढाकाराने भिवंडी पंचायत समितीतील सभापती व उपसभापती पदाबाबत भाजप व शिवसेना यांच्यात सहमती झाली असून यानुसारच पंचायत समितीच्या सभापतीपदी काल्हेर गणातून निवडून आलेले महेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
सभापती नमिता गुरव यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी तहसीलदार अधिक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भिवंडी पंचायत समिती सभागृहात सभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत महेंद्र पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने पीठासीन अधिकारी अधिक पाटील यांनी भाजपच्या महेंद्र पाटील यांची सभापती निवड जाहीर केली.
पाटील यांची निवड जाहीर होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समिती परिसरात एकच जल्लोष केला. या प्रसंगी गटविकास अधिकारी प्रदिप घोरपडे, भाजपचे आमदार महेश चौघुले,माजी आमदार योगेश पाटील,काल्हेर माजी सरपंच श्रीधर पाटील, जयवंत पाटील,पं. स. माजी उपसभापती गजानन असावरे,शैलेश शिंगोळे,ऍड.सिद्धार्थ भोईर आदी उपस्थित होते .