शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

आनंद दिघेंची खेळी खेळून २८ वर्षांनंतर भाजपने हिसकावले ठाणे, इतिहासाची पुनरावृत्ती होणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 07:58 IST

अगोदर ताकद दाखवली मग उमेदवार : बाळासाहेब ठाकरे - प्रमोद महाजन बैठकीत झाला होता निर्णय

अजित मांडके

ठाणे :  तब्बल २८ वर्षांनंतर एका खेळीचा वचपा काढत भाजपने ठाणे जिल्ह्यात आपणच कसे मोठे भाऊ आहोत, हे वरिष्ठ नेत्यांना दाखवून दिले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी १९९६मध्ये शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांनी कल्याण, भिवंडी, पालघर वगैरे परिसरात भाजपपेक्षा शिवसेनेची ताकद कशी जास्त आहे, याची आकडेवारी जिल्ह्याच्या नकाशावर मांडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामार्फत भाजप नेते प्रमोद महाजन यांना दिली होती. कागदावर शिवसेनेने ताकद अधिक असल्याचे सिद्ध केल्यावर भाजपचा नाइलाज झाला होता. विद्यमान खासदारांची जागा सोडताना शिवसेनेतर्फे येथे कोण निवडणूक लढवणार, असा प्रश्न आला तेव्हा आनंद दिघे यांनी आपणच निवडणूक लढवणार असल्याचे सांगून बोलती बंद केली होती. 

२८ वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ठाणे लोकसभेत सहापैकी चार आमदार भाजपचे आहेत. नवी मुंबई आणि मीरा - भाईंदर भाजपच्या ताब्यात आहेत. ठाण्यात भाजपचे नगरसेवक आहेत. याशिवाय जिल्ह्यात भाजप वाढत असून, प्रत्येक महापालिकेत भाजपचे संख्याबळ अधिक आहे. आता त्याच दबावतंत्राचा वापर करून भाजपने शिंदे सेनेला आपली वाढलेली ताकद दाखवली व ठाण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच उमेदवार असल्याचे गळी उतरवले.

ठाणे जिल्ह्यात यापूर्वी काँग्रेस आणि त्यानंतर भाजपचे वर्चस्व होते. रामभाऊ म्हाळगी, राम कापसे असा भाजपचा लोकसभेचा इतिहास आहे. त्यावेळेस पालघर, कल्याण, भिवंडी हे ठाणे लोकसभेचाच भाग होते. ठाणे जिल्ह्यात भाजपचे आमदार, खासदार किती, जिल्हा परिषदेत सदस्य किती, महापालिकेची स्थिती काय तसेच शिवसेनेची संघटनात्मक ताकद याची माहिती ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी प्रमोद महाजन यांच्यासमोर मांडली होती. 

शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर...

 शिवसेनेत दोन गट पडल्याने शिवसेनेची मते विभागली जाणार आहेत. त्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच निवडणूक लढवत असल्याचे मान्य करून महायुतीचे मेळावे घेण्यास शिंदेसेनेला भाग पाडले.  नवी मुंबईतील संजीव नाईक यांनी रविवारपासून मीरा भाईंदरमधून प्रचाराला सुरुवात केली, भाजपची खेळी फत्ते झाल्याचा हा पुरावा मानला जात आहे.

...आणि आनंद दिघे निवडणूक लढविण्याची बातमी पसरलीआनंद दिघे हेच ठाणे लोकसभा लढविणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. दिघे यांच्या नावाला विरोध करणार कोण, असा सवाल होता. दिघे लढणार म्हणून भाजपने ठाण्याची जागा शिवसेनेला सोडल्याचे जाहीर केले. विद्यमान भाजप खासदाराचे तिकीट कापण्याची खेळी दिघे खेळले. 

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाShiv Senaशिवसेना