अंबरनाथ - अंबरनाथ नगरपालिकेमध्ये मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. यामध्ये पुनर्वसन धोरण आणि शहरातील आरोग्याशी निगडीत विषयांवर चर्चा होणार होती. मात्र, बेकायदा बांधकामासंदर्भातील पत्र वाचण्याच्या वादातून शिंदेसेना आणि भाजपमध्ये सभागृहात जुंपली. त्यानंतर संख्याबळाच्या जोरावर शिंदेसेनेच्या सदस्यांनी सभाच तहकूब केल्याने गोंधळ निर्माण झाला. शिंदेसेनेच्या या भूमिकेनंतर भाजपच्या सर्व नगरसेवकांनी पालिका कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
शिंदेसेनेच्या नगरसेवकाचे अनुमोदनपालिका सभागृहात पुनर्वसन धोरणाबाबत चर्चा सुरू असताना शिंदेसेना आणि भाजप नगरसेवकांमध्ये पत्र वाचनाच्या विषयावरून वाद झाला. यावेळी शिंदेसेनेच्या अब्दुल शेख यांनी सभा तहकूब करण्याची सूचना केली आणि त्याला शिंदेसेनेच्या नगरसेवकाने अनुमोदन दिले. नगरपालिकेत सत्ता संघर्षावरून भाजप आणि शिंदेसेना यांच्यात गेल्या पाच महिन्यांपासून वाद सुरू आहे. त्यामुळे सभागृहातील कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे.
वादाची ठिणगी नेमकी कशामुळे ? अंबरनाथ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले यांचा विजय झाला होता. शिंदेसेनेचे २७ नगरसेवक निवडून आलेले असतानाही नगराध्यक्षपद हातातून गेल्यामुळे दोघांत वादाची ठिणगी पडली होती.
नगराध्यक्ष म्हणून सर्व नगरसेवकांचे विषय घेतले होते. एवढेच नव्हे तर शिंदेसेनेच्याच नगरसेवकांची अनेक पत्र असल्यामुळे आरोग्याशी निगडीत सर्व विषय चर्चेसाठी ठेवले होते. असे असतानाही त्या विषयावर चर्चा न करताच सभा स्थगित करणे योग्य नाही. त्यांच्या या निर्णयामुळे पावसाळ्यात आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.- तेजश्री करंजुले, नगराध्यक्ष, अंबरनाथ
Web Summary : In Ambernath, a BJP and Shinde Sena clash led to the adjournment of a municipal meeting due to disputes over illegal construction letters. BJP protested the decision. The conflict stems from a power struggle after the mayoral election.
Web Summary : अंबरनाथ में भाजपा और शिंदे सेना के बीच अवैध निर्माण पत्रों पर विवाद के कारण नगरपालिका की बैठक स्थगित कर दी गई। भाजपा ने फैसले का विरोध किया। महापौर चुनाव के बाद सत्ता संघर्ष से विवाद उत्पन्न हुआ।