शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप

By धीरज परब | Updated: September 29, 2025 22:19 IST

काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले आरोप

धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: विधानसभा निवडणुकीवेळी मतदारयादीत मोठ्या प्रमाणात घोटाळे करून बोगस मतदानासह वोटचोरी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवडून आलेल्या भाजपा आमदाराच्या जवळच्या पदाधिकाऱ्याने सहकुटुंब मीरा भाईंदरमध्ये तीन ठिकाणी मतदार यादीत नावे असल्याचे काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर मीरारोडमधील एका दुकानाच्या पत्त्यावर तब्बल २५ मतदारांची नोंद केली गेल्याचेही सांगण्यात आले.

काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन सह जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, आफरीन सय्यद, प्रकाश नागणे, ऍड. राहुल राय, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे, दीपक बागरी, जय ठाकूर आदींनी सोमवारी सायंकाळी मीरारोड येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी विधानसभा निवडणुकी आधी मीरा भाईंदर शहरातील १४५ आणि १४६ मतदार संघातील ९० हजार मतांची गडबडी असल्याची तक्रार काँग्रेसने गेल्या वर्षी दिली होती. त्याचे उत्तर आयोगा कडून आता मिळाले असून त्यात आहे मीरा भाईंदर १४५ विधानसभा मतदारसंघात ५३ हजार ५४८ मतांची वाढ झाल्याचे तसेच ४,९१३ मतदार वगळले असल्याचे कळवले आहे. 

बोगस मतदार नोंदणी, प्रत्यक्ष रहात असलेल्या मतदारांची खात्री न करताच चुकीच्या व दुबार नावांची नोंद, मानमर्जीने अनेकांची नावे परस्पर काढून टाकणे आदी अनेक आरोप यावेळी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर केले गेले. आयोगा कडे उत्तर मागितले असता भाजपा आमदार उत्तर देतात या बद्दल हुसेन यांनी आश्चर्य व्यक्त केले. आम्ही आयोगाला विचारणा केली असता भाजपाचे लोकं फुकटची प्रवक्तेगिरी कशाला करतात असा टोला त्यांनी लगावला.

दीपक बागरी यांनी सांगितले कि, आ. नरेंद्र मेहतांचे निकटवर्ती भाजपा पदाधिकारी  रविकांत रामप्रकाश उपाध्याय हे २०१७ पासून भाईंदरच्या गोल्डन नेस्ट भागात रहात असून ओवळा माजिवडा १४६ मद्ये त्यांचे व पत्नीचे नाव आहे. तसे असताना मीरा भाईंदर मतदार संघात उपाध्याय व पत्नीचे म्हाडा, पूनम कॉम्प्लेक्स आणि भाईंदरच्या भीमनाथ इमारतीच्या पत्त्यांवर देखील मतदार यादीत फोटो सह नांवे असल्याचे दाखवले. म्हणजेच खोटी कागदपत्रे, फेक आयडी बनवून भाजपाचेच पदाधिकारी बोगस मतदार यादीत असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी बागरी यांनी केली. अशी हजारो नावे असून माहिती अधिकारात देखील याची माहिती देण्यास आयोग टाळाटाळ करत आहे. 

मीरारोडच्या पूनम सागर कॉम्प्लेक्स मधील अस्मिता उपहार इमारतीच्या दुकान क्रमांक ११ ह्या पत्त्यावर तब्बल २५ मतदारांची नावे असून वेगवेगळ्या आडनावांच्या ह्या मतदारांची मतदार ओळखपत्रे देखील आयोगाने दिली आहेत असे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी त्याच्या टपाल प्रति वाचून दाखवल्या. 

भाजपा पदाधिकाऱ्याच्या अनेक ठिकाणी मतदार यादीतील नावा वरून बोगस वोटर व नोंदणी, वोटचोरी करून भाजपाच्या उमेदवारास मतांचा फायदा करून देण्यासाठी हे कारस्थान निवडणूक आयोग, बीएलओ आदींनी भाजपाशी मिळून केल्याचे शिक्कामोर्तब होत असल्याचे यावेळी सामंत म्हणाले.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदानcongressकाँग्रेसBJPभाजपा