शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

भाजपा आमदाराच्या संघटनेने पुकारलेला संप सुरुच,  चौथ्या दिवशीही प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 10:31 PM

ऐन सुट्या व नाताळ सणात मीरा भार्इंदर महापालिकेची बससेवा बंद पाडणारया भाजपा आमदाराच्या कर्र्मचारी संघटनेने संपाची भुमिका कायम ठेवली असतानाच दुसरी कडे आयुक्तांनी देखील आक्रमक

मीरारोड - ऐन सुट्या व नाताळ सणात मीरा भार्इंदर महापालिकेची बससेवा बंद पाडणारया भाजपा आमदाराच्या कर्र्मचारी संघटनेने संपाची भुमिका कायम ठेवली असतानाच दुसरी कडे आयुक्तांनी देखील आक्रमक भुमिका घेत मंगळवारी सायंकाळ पासुन बेस्ट बसची सेवा उत्तन मार्गावर सुरु केल्याने संपकरी धास्तावले आहेत. त्या आधी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन लोकांना वेठीस धरणारयांवर कारवाई करा आणि पर्यायी व्यवस्था करा अन्यथा नागरीकांसह शिवसेना रस्त्यावर उतरेल. उत्तनला कचरयाची एकही गाडी जाऊ देणार नाही असा इशारा दिला.महापालिकेत सत्ता असुन ही भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या अध्यक्षते खालील श्रमिक जनरल कामगार युनियनच्या परिवहन उपक्रमाच्या कंत्राटी कर्मचारयांना किमान वेतनातील फरक, कमी मिळालेले वेतन आदी समस्या सोडवण्यात यश आले नाही. त्यातच शुक्रवार पासुन आ. मेहतांच्या नेतृत्वाखाली कंत्राटी कर्मचारयांनी अचानक संप सुरु करुन बस सेवा बंद पाडली.या मुळे सुट्या तसेच नाताळच्या सणात मुर्धा ते उत्तन - चौक, गोराई, काशिमीरा, हाटकेश, कनकिया आदी भागातील हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. रिक्षावाल्यांनी देखील अव्वाच्या सव्वा भाडं आकारुन प्रवाशांना नाडण्यास सुरवात केली.शूक्रवार पासुन संप सुरु झाला असताना देखील पालिका प्रशासन केवळ सत्ताधारी भाजपा समोर बघ्याची भुमिका घेत होतं. शिवसेनेने सत्ताधारी भाजपा व प्रशासनाच्या निषेधाचे फलक लावले. मंगळवारी दुपारी शिवसेनेचे मीरा भार्इंदर विधानसभा प्रमुख अरुण कदम सह नगरसेविका हेलन गोविंद, शर्मिला बगाजी, अर्चना कदम, नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर, शहर प्रमुख प्रकाश मांजरेकर आदिंसह शिवसैनिकांनी आयुक्तांची भेट घेऊन संताप व्यक्त केला.पालिकेने तातडीने बेस्ट, टिएमटी ची सेवा सुरु करावी, रिक्षा चालक संघटनांशी बोलुन रास्त भाडे आकारावे, खाजगी बसना सेवा देण्यास सांगावे आदी मागण्या करत प्रवाशी संतापले असुन शिवसेना त्यांच्या सोबत रस्त्यावर उतरेल. वेळ पडल्यास उत्तनच्या डंपीग ग्राऊण्ड ला जाणारया कचरयाच्या गाड्या अडवु असा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला. आयुक्तांनी देखील कंत्राटी कर्मचारयांची देणी देण्यासाठी आर्थिक तरतुद केली जात असल्याचे सांगुन बेस्ट व टिएमटीशी बोलणी सुरु असल्याचे सांगीतले.दरम्यान सायंकाळ पासुन बेस्टच्या चार बस उत्तन मार्गावर सुरु करण्यात आल्या आहेत. या मुळे संपकरी धास्तावले असले तरी पालिकेने मात्र कर्मचारयांची थकित देणी देण्यासाठी वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. बेस्टची सेवा सुरु झाल्याने उत्तन भागातील प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.आ. मेहता यांनी रात्री नगरभवन येथे संपकरी कर्मचारयांची भेट घेऊन भाजपा देखील आंदोलना पाठीशी असल्याचे आश्वासन दिल्याचे कर्मचारयाने सांगीतले. तर पालिकेने बेस्ट बस सुरु केल्या नंतर भार्इंदर पोलीसांना देखील संपकरयां कडुन कायदा सुव्यवस्था बिघडवली जाऊ नये म्हणुन बंदोबस्त ठेवण्याची विनंती केली आहे.