कल्याण-डोंबिवली महानगर क्षेत्राच्या विकासासाठी भाजपाचा जाहीरनामा

By Admin | Updated: August 28, 2015 00:15 IST2015-08-28T00:15:45+5:302015-08-28T00:15:45+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील विकासाची सूत्री असलेल्या सब का साथ, सबका विकास... या धोरणाचा आधार कल्याण-डोंबिवली महानगर क्षेत्राच्या समतोल आणि सर्वांगीण

BJP manifesto for development of Kalyan-Dombivli metropolitan area | कल्याण-डोंबिवली महानगर क्षेत्राच्या विकासासाठी भाजपाचा जाहीरनामा

कल्याण-डोंबिवली महानगर क्षेत्राच्या विकासासाठी भाजपाचा जाहीरनामा

डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील विकासाची सूत्री असलेल्या सब का साथ, सबका विकास... या धोरणाचा आधार कल्याण-डोंबिवली महानगर क्षेत्राच्या समतोल आणि सर्वांगीण विकासासाठी घेण्यात येणार आहे.
जनसामान्यांच्या सहकार्याने विकासाचे नियोजन करण्यासाठी जिल्हा भाजपाच्या माध्यमातून जनतेचा जाहीरनामा बनवण्याचे काम सुरू झाले आहे. समाजसेवक, विकासक, वास्तूविशारद, डॉक्टर, वकील, कलाकार, विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार महिला आदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत जाऊन त्यांचे मत जाणून जनतेचा जाहीरनामा बनविण्यात येणार आहे. याच जाहीरनाम्याच्या माध्यमातून जनतेच्या विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी भाजपा आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांना सामोरे जाईल, अशी माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बुधवारी भाजपा नेत्यांनी दिली.

Web Title: BJP manifesto for development of Kalyan-Dombivli metropolitan area