शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

कोरोना रुग्णाच्या आत्महत्येची चौकशी करण्यात यावी, भाजप नेते किरीट सोमय्या यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 8:39 PM

ठाणे जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा वारंवार वाढत आहे. तो कमी होत नाही. त्यामुळे रुग्णांमध्ये भयाचे वातावरण आहे याकडे सोमय्या यांनी लक्ष वेधले आहे.

ठळक मुद्देटाटा आमंत्रा कोविड सेंटरच्या पाचव्या मजल्यावरुन कोरोना रुग्ण प्रशांत आंबेकर याने उडी घेऊन आत्महत्या केली.

कल्याण - टाटा आमंत्रा येथील कोविड सेंटरच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन कोरोना रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना काल घडली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज केली आहे.

टाटा आमंत्रा कोविड सेंटरच्या पाचव्या मजल्यावरुन कोरोना रुग्ण प्रशांत आंबेकर याने उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेची दखल घेत आज भाजप नेते सोमय्या यांनी टाटा आमंत्राला भेट दिली. यावेळी भाजप आमदार रविंद्र चव्हाण, महेश चौगूले, भाजप पदाधिकारी संतोष शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी टाटा आमंत्र येथील अधिकारी वर्गाची सोमय्या यांनी भेट घेतली. प्लोअरच्या पॅसेजमध्ये जाळी नाही. ती जाळी तातडीने लावली जावी अशी मागणी सोमय्या यांनी केली. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच कोरोनावर अद्याप लस देखील आलेली नाही. त्यामुळे अनेक रुग्ण धास्तावलेले आहेत. त्यासाठी प्रत्येक कोविड सेंटरमध्ये मानस उपचार तज्ज्ञ नेमण्यात यावी. ज्याचाकडून रुग्णाचे समुपदेशन केले जाईल. कल्याण डोंबिवली व भिवंडी परिसरात रुग्ण पळून जाणे, आत्महत्या करणे या सारख्या चार घटना आतापर्यंत घडलेल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा वारंवार वाढत आहे. तो कमी होत नाही. त्यामुळे रुग्णांमध्ये भयाचे वातावरण आहे याकडे सोमय्या यांनी लक्ष वेधले आहे.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा नामोल्लेख न करता सोमय्या यांनी पवार यांच्यावर टिका करताना काही नेते रामजन्मभूमीवर भाष्य करण्यात मशगूल आहेत. पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चार महिन्यापासून फेसबूकवर संवाद साधत आहे. या फेसबूक लाईव्हचा जनतेला कंटाळा आला आहे. फेसबूक लाईव्ह करण्यापेक्षा कल्याण डोंबिवली व भिवंडीतील कोरोना रुग्णांची संख्या रोखण्यासाठी आरोग्याच्या काय सोयी सुविधा पुरविल्या याचे उत्तर द्या. आरोग्य मंत्री राजेश टोपे व अनिल देशमुख या सगळ्य़ा परिस्थितीला जबाबदार असून ठाकरे सरकार आत्ता तरी जागे व्हा असे आवाहन सोमय्या यांनी केले आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मेट्रो सिटीत IS ची कमान महिलांच्या हाती; NIAचा मोठा खुलासा

 

Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा

 

दहा रुपये, समोसा अन् घडली भयावह घटना; शाळकरी मुलाने गळफास लावून केली आत्महत्या 

 

वेदनादायी! शेतात घुसली म्हणून सांडणीचे कुऱ्हाडीनं कापले पाय; तडफडत सोडला जीव

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKirit Somaiyaकिरीट सोमय्याthaneठाणेSuicideआत्महत्याhospitalहॉस्पिटल