शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

लस घेण्यासाठी सेलेब्रिटी झाली पार्कीग प्लाझा कोविड सेंटरची सुपरवायझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 18:59 IST

नियमबाह्य पद्धतीने महापालिकेने लसीकरण केल्याचं सांगत भाजपने घेतला आक्षेप

ठळक मुद्देनियमबाह्य पद्धतीने महापालिकेने लसीकरण केल्याचं सांगत भाजपने घेतला आक्षेपसोशल मीडियावर फोटो टाकल्यानंतर प्रकार आला समोर

ठाणे  : सर्वसामान्यांसाठी लसींचा तुटवडा असल्याचे महापालिका सांगत आहे. त्यामुळे लस मिळविण्यासाठी सर्वसामान्य ठाणोकर तासंनतास रांगेत उभा राहत आहे. परंतु दुसरीकडे १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद असतांनाही ठाणे महापालिकेच्या पार्कीग प्लाझा येथील कोविड सेंटरमध्ये सुपरवाझर असल्याचे भासवून चक्क एका महिला सेलेब्रिटीने लसीकरण करुन घेतल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तर तिला फ्रन्ट लाइन वर्करचे ओळखपत्र देणारी संस्था देखील या निमित्ताने आता अडचणीत आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी शहर भाजपच्यावतीने करण्यात आली आहे. एवढ्या मोठय़ा सेलेब्रिटीला फ्रन्ट लाइन वर्कर म्हणून काम करण्याची गरजच काय? असा सवाल उपस्थित करीत चुकीच्या पध्दतीने ओळखपत्र  बनवून देणाऱ्या संबंधित एजन्सीवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपच्यावतीने करण्यात आली आहे.  मागील जवळ जवळ एक महिन्यापासून ठाण्यात लसीकरणाची मोहीम संथ गतीने सुरु आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्याची मागणी करुनही ती पूर्ण होत नाही. लसींचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने लसीकरण वेगाने करता येत नसल्याचे महापालिका प्रशासन आणि महापौर नरेश म्हस्के हे सांगत आहेत. लसींचा साठा मिळावा यासाठी भाजप प्रणित केंद्र सरकारवर टिका देखील केली जात आहे. शहरात लसीकरण वेगाने व्हावे या उद्देशाने महापालिकेने ५२केंद्रावर लसीकरण सुरु केले होते. परंतु लसींचा साठा नसल्याने शहरातील १२ ते १५ केंद्रावरच लसीकरण मोहीम सुरु आहे. त्यातही दिवसाला कोणत्या केंद्रावर कीती लसींचा साठा शिल्लक आहे, या पध्दतीने तेवढय़ाच सर्वसामान्य नागरीकांना लस दिल्या जात आहेत. उर्वरीत नागरीकांना घरी पाठविले जात आहे. त्यातही लसींचा साठा पुरेसा नसल्याने राज्य शासनाकडून १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण थांबविण्यात आले आहे. असे असतांना नियमबाह्य पध्दतीने लसीकरण सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण बंद असतांनाही सध्या पार्कीग प्लाझा येथे एका तरुण महिला सेलिब्रेटीन लस घेतल्याची माहिती समोर आली आहे. तिनेच आपण लस घेतल्याचे फोटो सोशल मिडियावर टाकले आहेत. विशेष म्हणजे ती पार्कीग प्लाझा कोवीड सेंटरमध्ये सुपरवायझर या पदावर कार्यरत असल्याचे ओळखपत्र  देखील आता समोर आले आहे. याचाच आधार घेत तिने लसीकरण करुन घेतल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ग्लोबल हॉस्पीटलचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेकडून हे ओळखपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ती या ठिकाणी केव्हा पासून कामाला आहे, तिला या कामाची काय गरज पडली असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन दोषी असलेल्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी देखील भाजपच्यावतीने करण्यात आली आहे.

नियमबाह्य पध्दतीने लस दिली जात असेल तर सर्वसामान्यांसाठी लस का उपलब्ध करुन दिली जात नाही. असा सवाल भाजपच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. "सर्वसामान्य जनता उपाशी आणि सेलिब्रेटी तुपाशी," असाच काहीसा हा प्रकार असल्याचा आरोप भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला आहे. त्यातही तिची पोस्ट पाहून शनिवारी या वयोगटातील असंख्य तरुणांनी पार्कीग प्लाझा येथे लस घेण्यासाठी गर्दी केली होती. परंतु त्यांना मात्र लस दिली गेली नाही. महापालिकेची ही कोणती पद्धत आहे. असा सवालही डुंबरे यांनी उपस्थित केला आहे. नियमबाह्य पध्दतीने सुरु असलेले लसीकरण तत्काळ थांबविण्यात यावे अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. त्यातही सातत्याने सत्ताधाऱ्यांकडून असे प्रकार घडत असून तरी देखील ते चूक मान्य करण्यास तयार नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

इंस्टाग्राम आणि ट्विटरवर टाकली पोस्ट संबंधित सेलिब्रेटीने लस घेतल्यानंतर स्वतःच इन्स्ट्राग्राम आणि ट्विटरवर लस घेतल्याची पोस्ट टाकली. त्यानंतर तिची पोस्ट पाहून शनिवारी या वयोगटातील असंख्य तरुणांनी पार्कीग प्लाझा येथे लस घेण्यासाठी गर्दी केली होती. परंतु त्यांना मात्र लस दिली गेली नाही. परंतु सोशल मिडियावर टिका झाल्यानंतर तिने हे फोटो सोशल मिडियावरुन काढल्याचेही दिसून आले आहे.  १४-४४ वयोगटाचं लसीकरण बंदराज्य शासनाकडून १८ ते ४४ वयोगटातील तरुणांचे लसीकरण बंद करण्यात आले आहे. तसेच ठाण्यातील सर्वसामान्यांना देखील लस घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. परंतु असे असतांना सेलेब्रिटींना लस कशी मिळते, ते वयात बसतात का? त्यांच्यासाठी लस कशी उपलब्ध करुन दिली जाते. या प्रकरणाची चौकशी करुन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.(मनोहर डुंबरे - गटनेते, भाजप - ठामपा)कारवाई निश्चितच केली जाईलया प्रकरणाचा तपास सुरु आहे, त्यामुळे कोणी अशा प्रकारे लस दिली, संबंधीत सेलेब्रिटीचे वय किती आहे, याची माहिती घेतली जात आहे. त्यानुसार योग्य ती चौकशी करुन पुढील कारवाई निश्चित केली जाईल.(संदीप माळवी , उपायुक्त, ठामपा) 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसthaneठाणेCelebrityसेलिब्रिटीBJPभाजपाtmcठाणे महापालिका