शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 06:39 IST

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: गेल्या वेळच्या तुलनेत त्यातही शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदेसेनेने एक अतिरिक्त जागा मिळवली. त्यामुळे शिंदेसेनाही जिल्ह्यात वरचढ ठरली.

अजित मांडके 

ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा जागांवर शिंदेसेना आणि भाजपचा बोलबाला असून १८ पैकी १६ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. भाजपचा स्ट्राइक रेट १०० टक्के, तर शिंदेसेनेचा स्ट्राइक रेट ९० टक्के आहे. त्यामुळे आता भाजपच ठाणे जिल्ह्यात मोठा भाऊ आहे. ठाणे जिल्हा हा उद्धवसेनेचा नव्हे तर शिंदेसेनेचा बालेकिल्ला आहे हेही अधोरेखित झाले. मागील महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी एकहाती सत्ता प्राप्त केली. यावेळी आता महायुतीत असलेल्या शिंदे यांना भाजपबरोबर युती करावी लागेल का आणि विधानसभेत मोठा भाऊ झालेल्या भाजपला जागा सोडाव्या लागतील का, असे प्रश्न भविष्यातील राजकारणाच्या उदरात दडले आहेत.

ठाणे जिल्ह्यात भाजप हा गेल्या वेळेसही मोठा भाऊ ठरला होता. भाजपने नऊ जागा लढवल्या होत्या. त्यातील आठ जागांवर त्यांना यश मिळाले होते, तर शिवसेनेला ९ पैकी ५ जागांवर यश आले होते. त्यामुळे भाजपच शिवसेनेवर भारी ठरल्याचे दिसून आले. या विधानसभा निवडणुकीतही भाजपने १०० टक्के स्ट्राइक रेट ठेवून जिल्ह्यावर आपला वरचष्मा कायम ठेवला. गेल्या वेळेच्या तुलनेत भाजपची एक जागा वाढली, शिवसेना फुटल्यानंतर जिल्ह्यात शिंदेसेनेला आपली ताकद दाखविण्याची किंबहुना ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच बालेकिल्ला असल्याने ही निवडणूक त्यांच्यासाठीही तितकीच महत्त्वाची होती. शिंदेसेनेने सात जागा लढवल्या होत्या. त्यातील भिवंडी पूर्वची जागा वगळता शिंदेसेनेने सहा जागांवर विजय मिळविला. गेल्या वेळच्या तुलनेत त्यातही शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदेसेनेने एक अतिरिक्त जागा मिळवली. त्यामुळे शिंदेसेनाही जिल्ह्यात वरचढ ठरली.

निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा पिंजून काढला होता. भाजप नेते फारसे जिल्ह्यातील आपल्या उमेदवारांसाठी फिरले नाहीत. मात्र, शिंदे यांनी भाजपच्या उमेदवारांसाठीही सभा घेतल्या, तसेच आपल्या पक्षातील प्रत्येक माजी नगरसेवकासह पदाधिकाऱ्यांनाही ही निवडणूक म्हणजे तुमची पालिकेची परीक्षा असल्याचे सांगितले होते. या निवडणुकीचे रिपोर्ट कार्ड तुमचे पालिकेचे भवितव्य ठरविणारी आहे, अशी ताकीदच दिली होती. त्यामुळेच त्यांचे माजी नगरसेवकही महायुतीच्या उमेदवारांसाठी मोठ्या जिद्दीने प्रचारात उतरले होते. त्याचे फलित म्हणजे ठाणे जिल्ह्यातील १८ पैकी १६ जागांवर महायुतीला मिळालेला विजय.

महायुतीला भक्कम बहुमत मिळाल्याने आता या अनुकूल वातावरणात मुंबई, ठाणे यासह विविध महापालिकांच्या निवडणुका सरकार लवकर घेईल. मागील महापालिका निवडणुकीत शिवसेना व भाजपमध्ये संघर्ष दिसला. ठाण्यातील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील नोकरशहा महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने कसा राजकीय हस्तक्षेप करीत आहेत, अशी नाराजी प्रकट केली होती. तेव्हाही भाजप-शिवसेना युती होती. परंतु उद्धव यांचा भाजपसोबत संघर्ष सुरू होता. निकाल लागले तेव्हा एकनाथ शिंदे यांनी स्वबळावर महापालिका जिंकली. स्व. आनंद दिघे यांच्या काळातही शिवसेनेला स्वबळावर महापालिका जिंकता आली नव्हती. ती किमया शिंदे यांनी केली. मागील सरकारचे मुख्यमंत्री शिंदे होते. आता शिंदे यांना भाजपसोबत युती करावी लागेल. अशा परिस्थितीत भाजपने विधानसभेच्या जास्त जागा जिंकल्या असल्याने भाजपने जिंकलेल्या विधानसभा मतदारसंघातील महापालिका जागांवर भाजपचे स्थानिक नेते दावा करतील, अशी शक्यता आहे. अशा परिस्थितीत शिंदे कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका